सातपूर l Satpur (प्रतिनिधी)

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने यंदाची भिमजयंती ही संपूर्ण सातपूर शहर मिळून एकच करणार असल्याचे भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

या भिमजन्माेत्सव समितीच्या अध्यक्षपदी मोहन आढागळे यांची तर उपाध्यक्षपदी निलेश भंदुरे यांची निवड करण्यात आली.

कार्याध्यक्षपदी योगेश गांगुर्डे, खजिनदारपदी अरुण काळे यांची भीम जन्मोत्सव समिती 2021 च्या वतीने निवड करण्यात आली. भीम जन्मोत्सव समितीच्या वतीने शासनाने घालून दिलेल्या नियमांचं पालन करत ही जयंती साजरी होणार असल्याचं सांगण्यात आले.