अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे त्र्यंबकेश्वर दर्शन

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे त्र्यंबकेश्वर दर्शन

त्र्यंबकेश्वर । वार्ताहर Trimbakeshwar

अभिनेत्री शिल्पा शेट्टी Actress Shilpa Shetty' आणि तिचा पती राज कुंद्रा Raj kundra यांनी आज त्र्यंबकेश्वराच्या Trimbakeshwar दरबारात देवदर्शनाला हजेरी लावली.

दर्शनानंंतर देवस्थान कार्यालयामध्ये त्यांचा देवस्थान विश्वस्तांच्या वतीने सत्कार करण्यात आला. विश्वस्त प्रशांत गायधनी, संतोष कदम यांनी त्यांचे स्वागत केले. तसेच त्र्यंबकेश्वर मंदिराविषयी माहिती दिली. त्यानंतर अन्नपूर्णा आश्रमात दर्शनाचा लाभ घेतला. देवस्थानचे सुरक्षा अधिकारी अमित टोकेकर व सहकारी उपस्थित होते.

गर्दी मुळे करोना नियमांना हरताळ

शिल्पा शेट्टी व तिचा पती आणि इतरजण मंदिरातून बाहेर पडत असताना त्यांना पाहण्यासाठी बघ्यांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. त्यावेळी सामाजिक अंतर, मास्क आणि करोना नियमांना हरताळ फासला गेला. मोठ्या गर्दीतून शिल्पा शेट्टी व त्यांच्या सोबतच्या त्यांच्या भगिनी तसेच वकील तीन वाहनांमधून बाहेर पडले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com