
नांदगाव । प्रतिनिधी | Nandgaon
शंभर वर्ष शेळी (Goat) म्हणून जगण्यापेक्षा दहा दिवस वाघासारखे (Tiger) जगा. तुम्ही किती दिवस जगले, यापेक्षा कसे जगले? याला अधिक महत्व असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (State President of Nationalist Youth Congress Mehboob Sheikh) यांनी संवादयात्रेप्रसंगी केले.
येथील वरद संकुलात आयोजित शरद युवा संवादयात्रेत ते बोलत होते. व्यासपिठावर जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, माजी आ. पंकज भुजबळ, संजय पवार, तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष बाळ कलंत्री, माजी नगराध्यक्ष बबलू पाटील, पुरूषोत्तम कडलग, दीपक गोगड, योगिता पाटील आदी उपस्थित होते. प्रदेशाध्यक्ष शेख पुढे म्हणाले, शांततेच्या काळात घाम गाळला तर युध्दाच्या काळात रक्त सांडण्याची वेळ येत नाही.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (Nationalist Youth Congress) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आतापासूनच ‘थेंबे थेंबे तळे साचे’ या उक्तीप्रमाणे कार्यकर्ता जोडला तर आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly elections) राष्ट्रवादी काँग्रेसचाच उमेदवार विजयी होईल, यात शंका नाही. त्यामुळे आतापासूनच तयारीला लागा, असे आवाहन त्यांनी केले. चिल्लरचा आवाज मोठा असतो, नोटांचा आवाज होत नाही मात्र किंमत मोठी असते. आपल्या माणसांची किंमत मोठी आहे. आपला माणूस सुशिक्षीत आहे. त्यामुळे कुणी अंगावर आले तर न घाबरता शिंगावर घेण्याचे काम युवक राष्ट्रवादी काँग्रेसने करावे, असेही प्रदेशाध्यक्ष शेख यांनी सांगितले.
यावेळी माजी आ. भुजबळ, पवार, जिल्हाध्यक्ष अॅड. पगार, युवक तालुकाध्यक्ष सोपान पवार, प्रसाद सोनवणे, तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद शेलार यांनी केले. हबीब शेख, माजी नगरसेवक वाल्मिक टिळेकर, दत्तू पवार, सचिन जेजूरकर, युवक शहराध्यक्ष गौतम जगताप, शिवा सोनवणे, दया जुन्नरे, राजू लाठे, नीलेश पवार, संपत पवार, संतोष बिन्नर, शिवा माळी, पुनीत चव्हाण, शुभम शिंदे, विशाल काळे, यश चव्हाण, विकास उशिरे, राहुल अहिरे आदिंसह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.