कार्यकर्त्यांनी रस्त्यावर यावे; राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तपासे यांचे आवाहन

कार्यकर्त्यांनी रस्त्यावर यावे; राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते तपासे यांचे आवाहन

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

महागाई (inflation), बेरोजगारी (Unemployment) व भ्रष्टाचाराने (Corruption) सर्वसामान्य जनता अक्षरश: त्रस्त झाली आहे.

जीवनावश्यक वस्तूंच्या गगनाला भिडलेल्या किंमतींमुळे गोरगरीबांपुढे उदरनिर्वाहचा बिकट प्रश्न उभा ठाकला असतांना या समस्यांकडे मात्र केंद्र व राज्यातील सरकारने दुर्लक्ष केले असल्याने या अन्यायाच्या विरोधात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येत आंदोलने (agitaiton) छेडावीत, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे (NCP Spokesperson Mahesh Check) यांनी येथे बोलतांना केले.

नंदुरबार (nandurbar) येथे मेळाव्यासाठी जात असलेले प्रदेश राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी मालेगावी (malegaon) भेट दिली असता येथील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करतांना तपासे बोलत होते. मालेगाव बाह्य विधानसभा अध्यक्ष विनोद चव्हाण (Malegaon Outer Legislative Assembly Speaker Vinod Chavan) यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

अच्छे दिनाचे स्वप्न दाखविणार्‍या मोदी सरकारने (Modi Government) जनतेसह बेरोजगार युवकांचा (unemployed youth) पुर्णत: भ्रमनिरास केला आहे. महागाई व बेरोजगारीचा (Inflation and unemployment) वनवा वाढला असून सर्वसामान्य गोरगरीब जनता त्यात अक्षरश: होरपळून निघत आहे. मात्र याप्रश्नांकडे भाजप सरकार (bjp government) दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे कुंभकर्णी झोप घेतलेल्या सरकारला जागे करण्यासाठी कार्यकर्त्यांनी रस्त्यावर येण्याची वेळ आली असल्याचे स्पष्ट करत तपासे पुढे म्हणाले,

राष्ट्रवादी काँग्रेस युवकांना दिशा देणारा पक्ष असल्याने युवकांनी यात सामिल व्हावे असे आवाहन त्यांनी शेवटी बोलतांना केले. बैठकीस विनोद शेलार, दीपक सावळे, प्रशांत महाजन, आबा साळुंके, विश्वास शेवाळे, सचिन शेवाळे, मनमोहन शेवाळे, सतिश जाधव, डॉ. धिरेंद्र चव्हाण, राहुल पवार, महेश शेरेकर, महेश कुमावत, मुन्ना देवरे, विरेंद्र जाधव, डॉ. संदीप पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com