वन्यप्राणी विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही, दिले 'हे' आदेश

वन्यप्राणी विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही, दिले 'हे' आदेश

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 मधील तरतुदीनुसार वन्यप्राण्यांचे अवयव बाळगणे व विक्री करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. या गुन्ह्यात 3 ते 7 वर्ष शिक्षेची तरतूद असून यानुसार वन्यजीव प्राण्यांचे अवयव बाळगल्यास व त्यांची विक्री केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग (Pankaj garg) यांनी दिली आहे...

वन्यजीव अथवा वन्य प्राण्यांचे (Wild Animal) अवयव कोणी बाळगल्याचे आढळून आल्यास त्याबाबतची माहिती नागरिकांनी वन विभागाच्या 0253-2572730 या दूरध्वनी क्रमांकावर द्यावी. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात ठेवण्यात येईल.

वन्यप्राणी विक्री करणाऱ्यांची आता खैर नाही, दिले 'हे' आदेश
सप्तशृंगी मातेच्या अभिषेकाबाबत घेतला 'हा' मोठा निर्णय

नागरिकांकडे कोणत्याही स्रोतामार्फत वन्यजीवांचे अवयव असल्यास त्यांनी ते तात्काळ उपवनसंरक्षक (पश्चिम भाग) यांच्या उंटवाडी वन वसाहत, संभाजी चौक, नाशिक या कार्यालयात जमा करावेत, असे आवाहन गर्ग यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com