'या' भागातील अतिक्रमणावर आठवडाभरात होणार कारवाई: मनपा आयुक्त

'या' भागातील अतिक्रमणावर आठवडाभरात होणार कारवाई: मनपा आयुक्त

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिकच्या विनय नगर भागात बांधकाम व्यवसायिक (Construction professional) व अधिकारी यांनी संगनमत करून दलित सैनिकाची जमीन बेकायदेशीर विकण्याचा घाट घातला असून कोणतीही परवानगी न घेता या ठिकाणी बांधकाम सुरू आहे.

नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal Corporation) आयुक्त यांची आज आमदार देवयानी फरांदे (MLA Devyani Farande) व सतीश कुलकर्णी, चंद्रकांत खोडे, यशवंत निकुळे, शाईन मिर्झा यांनी भेट घेतली. वारंवार तक्रार करून देखील कारवाई होत नसल्यामुळे आमदार देवयानी फरांदे यांनी नाराजी व्यक्त केली. नाशिकच्या विनय नगर भागात दलित कुटुंबाला सैन्यात काम केले म्हणून मिळालेली जमीन जिल्हाधिकार्‍यांच्या परवानगीशिवाय विकण्याचा प्रकार होत आहे.

या प्रक्रियेत शासनाच्या करोडो रुपयांच्या संपत्तीचे नुकसान झालेले असताना मनपा मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांकडे केला. गोरगरीब व सामान्यांच्या पत्र्याच्या शेड वर कारवाई करण्यासाठी तत्पर असणारा नगररचना विभाग (Town Planning Department) शांत का? असा उपस्थित करतांना यात नगररचना विभागाची भूमिका संशयास्पद असल्याचेयावेळी उपस्थितांनी स्पष्ट केले. याबाबत तत्काळ कारवाई न झाल्यास भूमिका तीव्र करण्याचा इशारा दिला. याबाबत आठ दिवसात कारवाई करण्याचे आश्वासन मनपा आयुक्तांनी दिले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com