शिक्षक मारहाण प्रकरणी कारवाई होणार

शिक्षक मारहाण प्रकरणी कारवाई होणार
USER

जानोरी । वार्ताहर Janori

दिंडोरी तालुक्यातील (Dindori Taluka) कादवा म्हाळूंगी येथील शिक्षक (Teacher) व मुख्याध्यापक (Headmaster) यांच्या हाणामारीच्या घटनेचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त केला असून शिक्षकच हाणामार्‍या करायला लागले तर विद्यार्थ्यांनी (Students) आदर्श घ्यावा कुणाकडून ? असा सवाल उपस्थित होत असून झालेल्या घटनेचे गांभीर्य बघता झालेल्या सत्य घटनेचे प्रस्ताव गटशिक्षणधिकारी भास्कर कनोज (Group Education Officer Bhaskar Kanoj) यांनी जिल्हा परिषदेला (Zilla Parishad) सादर केल्याने दोषींवर कारवाई होणार हे सिध्द झाले आहे.

कादवा म्हाळूंगी (Kadava Mhalungi) येथे गेल्या चार दिवसांपुर्वी मुख्याध्यापकाला शिक्षकाकडून मारहाण झाली होती. त्यानंतर झालेल्या नाट्यमय घडामोंडीनंतर मुख्याध्यापकावर दबाव की समझोता ? असा सवाल उपस्थित होवून कुणालाही पाठीशी न घालता सत्य परिस्थिती माहिती घेवून दोषींवर कारवाई करुन शिक्षण क्षेत्रात (Education sector) चुकीचा लोकांना पाठीशी घातले जात नाही व दोषीला शासन मिळते असा आदर्श घालून घ्यावा व शिक्षण विभागातही दरारा निर्माण व्हावा, अशी सर्व स्तरातून केली जात होती.

दोषींवर कारवाई होण्यासाठी संबंधित गटशिक्षणधिकार्‍यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला जाणे आवश्यक होता. परंतू त्यात अनेकांनी हस्तक्षेप करुन दाबादाबी करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे खरी माहिती जिल्हा परिषदेला जाते की नाही याबाबत शंका उपस्थित जात होती.

परंतू घटनेची गांभीर्य ओळखुन गटशिक्षणधिकारी भास्कर कनोज यांनी घटनेची सविस्तर चौकशी करुन खरी माहितीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला सादर केला असल्याची प्राथमिक माहिती मिळते. त्यामुळे दोषीवर कारवाई होणार हे नक्कीच झाले आहे. त्यामुळे यामध्ये दोषी कोण व दोषीवर कोणती कारवाई याची उत्सुकता अवघ्या जिल्ह्याला लागली आहे.

शिक्षण क्षेत्रात घडलेला प्रकार निदणीय आहे. झालेला प्रकाराच्या माहितीचा अहवाल गटशिक्षणधिकार्‍यांकडून जिल्हा परिषदेकडे सादर होताच याबाबत सविस्तर चौकशी करुन दोषीवर कारवाई केली जाईल व असा प्रकार इतरत्र घडणार नाही याची दक्षता घेतली जाईल.

- बाळासाहेब क्षिरसागार, अध्यक्ष जिल्हा परिषद, नाशिक

कादवा म्हाळूंगी येथील झालेला प्रकार निदणीयच आहे. झालेल्या प्रकाराचे कुणीही समर्थन करणार नाही. वरिष्ठ स्तरावरुन संबंधितावर कुणीही दबावाचे तंत्र वापरलेले नाही. घटनेची सविस्तर माहिती घेवून झालेली सत्य परिस्थितीचा प्रस्ताव आमच्या वरिष्ठ अधिकार्‍यांना सादर केला आहे.

- भास्कर कनोज, शिक्षणधिकारी, दिंडोरी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com