‘त्या’ दोषींवर कारवाई करणार : डॉ. पवार

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांकडून देशदूत वृत्ताची दखल
‘त्या’ दोषींवर कारवाई करणार : डॉ. पवार

दिंडोरी । प्रतिनिधी | Dindori

जिल्हा रुग्णालयात (district hospital) गरोदर मातेच्या उपेक्षा या मथळ्याखाली दै. देशदूतने (deshdoot) जिल्हा रुग्णालयातील जोखमीच्या गरोदर मातांची प्रसुतीची जबाबदारी झटकण्याचा प्रकाराबाबत सविस्तर वृत्त प्रसिध्द करताच केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार (Union Minister of State for Health Dr. Bharti Pawar) यांनी सदर वृत्ताची दखल घेऊन जिल्हा रुग्णालयाची चौकशी (Inquiry) लावून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.

जोखमीच्या मातांना तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येते परंतू तेथे जोखमीच्या मातांना उपचार मिळू शकत नसेल तर ते फक्त शोभेसाठी आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित करुन पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार याकडे लक्ष देण्याची मागणी दै. देशदूतच्या माध्यमातून केली होती.

त्याची दखल केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी घेतली आहे. डॉ. भारती पवार (dr. bharti pawar) सध्या मिझोराममधील (Mizoram) आरोग्य पायाभूत सुविधांचा आढावा (Review of health infrastructure) घेण्यासाठी तीन दिवसाच्या दौर्‍यावर आहेत. दौर्‍यावर असताना देखील जिल्हा रुग्णालयाच्या कारभारावर संताप व्यक्त करणारे वृत्त दै. देशदूतने प्रसिध्द केल्याची माहिती त्यांना मिळताच त्यांनी त्या घटनेची संपूर्ण माहिती मागितली असून सदर मातेच्या आरोग्याची चौकशी करुन जिल्हा रुग्णालयात त्या मातेवर उपचार करण्यासाठी कोणत्या गोष्टींची कमतरता होती.

याबाबत विचारणा करुन दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन देशदूतशी बोलतांना दिले आहे. लखमापूर (lakhmapur) येथील आरती गुंजाळ या मातेला दिंडोरी (dindori) येथील ग्रामीण रुग्णालयात (rural hospital) दाखल करण्यात आले. तेथे आवश्यक त्या तपासण्या केल्यानंतर सदर मातेला कावीळ झालेली आढळले. जिल्हा रुग्णालयाऐवजी त्यांची प्रसुती मविप्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या (MVP Medical College) रुग्णालयात झाली. प्रसुती सामान्य झाल्याने जिल्हा रुग्णालयातील उपचार आणि आरोग्य सेवकांच्या क्षमतेविषयी शांसकता निर्माण झालेली आहे.

त्याचबरोबर रक्ताचेही प्रमाण कमी असल्याने डॉक्टरांनी (doctors) संबंधित मातेच्या नातेवाईकांना जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला. जिल्हा रूग्णालयात सर्व सुखसोयी जागेवर उपलब्ध होतील व ऐनवेळी धावपळ होणार नाही, असे नातेवाईकांना पटवून देण्यात आले. परंतु तेथे गेल्यावर उपचाराऐवजी इतरत्र हलविण्याचेच सल्ले जिल्हा रूग्णालयात मिळत असल्याने नातेवाईकांमध्ये घबराट निर्माण झाली.

या रूग्णालयात आवश्यक त्या सेवा सदर मातेला मिळणार नाही आणि त्या मिळाल्या नाहीतर माता व बाळ या दोघांच्याही जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, असे सांगून नातेवाईकांची तारांबळ उडवली होती. खाजगी रूग्णालयात (privet hospital) नेण्याची परिस्थिती नसल्याने नातेवाईकांनी सदर मातेला मेडिकल कॉलेज, आडगाव येथे दाखल केले आणि विशेष म्हणजे सुरक्षित नैसर्गिक प्रसूती होवून त्या मातेने एका मुलीला जन्म दिला. माता व बाळ दोन्ही सुरक्षित असल्याने नातेवाईकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. ऐनवेळी झालेली धावपळ नक्कीच संतापजनक होती.

जिल्हा रुग्णालयात कायम असे प्रकार घडत आहे. जबाबदारी झटकणे, रुग्ण व नातेवाईकांशी अरेरावी करणे अशा घटना कायम ऐकावयास मिळतात. जिल्हा रुग्णालयात ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्व सामान्य कुटूंबातील जनता आरोग्य सेवेसाठी दाखल होत असते. शासनाच्या सुविधा जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी जिल्हा रुग्णालयात कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे.

जनतेच्या सेवेसाठी त्यांची नियुक्ती केलेली असताना ते जनतेचे मालक होवू पाहतात हे सर्व राजरोसपणे सुरु असताना यावर कुणीही बोलायला तयार नाही, ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. कोट्यावधीचा निधीचा खर्च करुन शासन गोरगरीब जनतेला आरोग्याच्या सेवा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करीत असतो. परंतू जिल्हा रुग्णालयातील अशा सुत्य कर्मचार्‍यांमुळे या योजनांवर पाणी फिरते, हेच वास्तव यावरुन स्पष्ट होते. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार ह्या सध्या मिझोराच्या आरोग्यविषयक समस्यांवर मात करण्यासाठी दौर्‍यावर आहेत.

जिल्ह्यात अशी परिस्थिती असेल तर ते नक्कीच चुकीचे ठरेल. तरी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी यावर लक्ष केंद्रीत करुन दोषींवर कारवाई करुन पुन्हा असा प्रकार घडू नये, याची दक्षता घ्यावी, हीच अपेक्षा जनतेची आहे.

गोरगरीबांची आरोग्य सेवेसाठी हेळसांड

ग्रामीण रुग्णालयात गरोदर मातांना दाखल केल्यानंतर प्रसुतीसाठी अडचण असेल तरच जिल्हा रुग्णालयाला पाठवणे अपेक्षित आहे. परंतू तसे न होता तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयातून बहुतेक मातांना जिल्हा रुग्णालयातच पाठवले जाते व तेथे गेल्यावर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचार्‍यांचा संताप रुग्ण व नातेवाईकांना सहन करावा लागतो.

जिल्हा रुग्णालयात सर्व सुविधा असतांना तेथील प्रशासन जबाबदारी का झटकते?हा सवाल उपस्थित होतो. लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष केंद्रीत करुन संबंधितांवर कार्यवाही केली तरच ग्रामीण भागातील सर्व सामान्य व अशिक्षित जनतेला न्याय मिळू शकतो.

जिल्हा रुग्णालयात रुग्ण घेऊन जायचे म्हटले तर सर्व सामान्यांच्या अंगाला काटा येतो. कारण तेथील कर्मचारी अरेरावी करतात. ग्रामीण भागातून आलेल्या अशिक्षित व गोरगरीब जनतेला जिल्हा रुग्णालयात असंवेदनशील वागणूक मिळते. त्यांच्या तक्रारी केल्या तरीही कर्मचार्‍यांच्या वर्तवणुकीत कोणताही फरक पडत नाही. वरिष्ठ अधिकारी कारवाईचा आव आणतात. दै. देशदूतने यावर आवाज उठवून नक्कीच ग्रामीण भागातील जनतेला न्याय मिळवून दिला आहे.

प्रवीण जाधव, माजी गटनेते जिल्हा परिषद, नाशिक

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com