नियमांचे उल्लंघन करणार्‍या हॉटेल्सवर कारवाई करणार

नियमांचे उल्लंघन करणार्‍या हॉटेल्सवर कारवाई करणार

नवीन नाशिक । प्रतिनिधी New Nashik

करोनाबाबतच्या शासकीय नियमांचे उल्लंघन करणार्‍या हॉटेल्सवर ( Hotels ) कारवाई करून त्यांचे परवाने रद्द करण्यात येणार असल्याचे वपोनि कुमार चौधरी ( Senior Police Inspector Kumar Chaudhary. )यांनी सांगितले.

स्टेट बँक चौकातील हॉटेल सोनाली येथे किरकोळ कारणावरून झालेल्या खुनाच्या पार्श्वभूमीवर अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व हॉटेल, रेस्टॉरंट, बार चालक व मालकांची बैठक अंबड पोलीस ठाणे येथे आयोजित करण्यात आली.

यावेळी वपोनी कुमार चौधरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, स्टेट बँक चौक या ठिकाणी घडलेली खुनाची घटना ही खरोखरच दुर्दैवी आहे. शासनाचे नियम धाब्यावर बसवत रात्री उशिरापर्यंत हॉटेल चालू असल्याने त्या ठिकाणी खुनासारखी दुर्दैवी घटना घडली.

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये बरेच हॉटेल व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करून आपला व्यवसाय सुरू ठेवत आहेत. यापुढे अशा हॉटेल्सवर कायदेशीर कारवाई करून लायसन रद्द करण्यात येईल. हॉटेलमध्ये कोणी गुन्हेगार फुकट मध्ये जेवणाची मागणी करत असेल तर तत्काळ पोलिसांशी संपर्क साधून त्याची माहिती द्यावी.

सदर व्यावसायिकांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल व संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्यात येईल, असेही यावेळी वपोनी चौधरी यांनी सांगितले. यावेळी सपोनी किशोर कोल्हे, उपनिरीक्षक कैलास सोनवणे, सविता गवांदे उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com