अवैध देशी दारू विक्री; दोघांवर कारवाई

अवैध देशी दारू विक्री; दोघांवर कारवाई

नवीन नाशिक | प्रतिनिधी | New Nashik

अंबड पोलिसांनी (Ambad Police) दोन विविध ठिकाणी अवैध देशी दारू (Illegal liquor) विकणाऱ्यांवर कारवाई करून त्यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे....

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन नाशकातील विजयनगर बस स्टॉपजवळ (Vijayanagar bus stop) सागर चंद्रकांत घुगे (Sagar Ghuge) (29, मोरवाडी गाव, मारुती मंदिराजवळ ) हा अवैधरीत्या देशी दारूची मद्य विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना गोपनीय सुत्रांनी दिली. यावरून त्याच्यावर कारवाई करत देशी दारूच्या 51 बाटल्या असा 2790 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.

दुसऱ्या घटनेत रवींद्र देवचंद शितोळे (Ravindra Shitole) (३३, रा. दत्त चौक भाजी मार्केट ) हा दत्त चौक भाजी मार्केटमध्ये अवैधरित्या देशी दारूची विक्री करीत असताना पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून सुमारे 11 हजार 850 रुपयांच्या 319 लहान व मोठ्या बाटल्या जप्त करून त्याच्यावर कारवाई केली.

कारवाईत अंबड पोलीस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी (Kumar Chaudhary) यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गणेश शिंदे, पोलीस नाईक विजय पगारे, अनिरुद्ध येवले, राकेश राऊत, प्रशांत नागरे, योगेश रेवगडे, राकेश पाटील, पूनम जाधव यांनी सहभाग घेतला.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com