नाशिक | Nashik

मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात, दि. ०१ एप्रिल २०२१ रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान प्रभाग कार्यालय क्रमांक एक चे कार्यक्षेत्रातील प्रथम बियर बार व सन्मान बियर बार या हॉटेलवर निर्धारित वेळेपेक्षा अधिक वेळ हॉटेल चालले म्हणून महापालिकेचे पथक व पोलिस विभागाचे पथक यांनी संयुक्तिक दंडात्मक कारवाई केली आहे. त्यांच्या कडून प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आले.

सदर कारवाई ही सहाय्यक आयुक्त कर तुषार आहेर साहेब यांच्या नियंत्रना खाली प्रभाग अधिकारी हरीश डिंबर, पथक प्रमुख पुंडलिक ढोणे, सचिन रावेरकर, चेतन शिरसाठ सिद्धार्थ आहिरे, तसेच पोलिस विभागाचे कर्मचारी यांनी ही कारवाई केली.

मालेगाव महानगरपालिका क्षेत्रामध्ये प्रतिबंधात्मक आदेशाचे काटेकोर पालन करण्यासाठी महापालिका उपायुक्त मुख्यालय रोहिदास दोरकुळकर तसेच उपायुक्त विकास तथा इन्सिडेंट कमांडर नितीन कापडणीस यांनी प्रभाग अधिकारी यांच्या अधिपत्याखाली पथक नेमले असून सहा. आयुक्त तुषार आहेर यांच्या नियंत्रणाखाली आदेशाची काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर मनपा प्रभाग अधिकारी , कर्मचारी आणि पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त पथकासह धडक कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे नियम मोडणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.