नियम न पाळल्याने दोन व्यवसायिकांवर कारवाई

नियम न पाळल्याने दोन व्यवसायिकांवर कारवाई

नविन नाशिक । प्रतिनिधी

करोना काळात शासनाने कडक निर्बंध जाहीर केले असुन सुध्दा काही जण नियम पाळत नाही. मनपा आरोग्य विभागाने नवीन नाशकात वेळे नंतर दुकाने चालु ठेवल्याने दोन दुकानदार व तसेच मास्क न वापरणारे सात जणांवर कारवाई करून एकाच दिवशी सुमारे पंचवीस हजार रुपये दंड वसूल केला.

मनपा घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ.कल्पना कुटे, नवीन नाशिक विभागीय अधिकारी डॉ. मयुर पाटील यांचे सूचनेनुसार विभागीय स्वच्छता निरीक्षक संजय गांगुर्डे यांचे मार्गदर्शनाखाली स्वच्छता विभागाचे अधिकारी व सेवकांनी करोना विषाणू कोविड 19 प्रतिबंधक उपाय योजनेच्या अनुषंगाने कारवाई करण्यात आली.

यात सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर न करणेबाबत 7 जणांवर कारवाई करून 24,600 रुपयांची दंडात्मक कारवाई करून दंड वसूल करण्यात आला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com