कॉपीबहाद्दरांवर कारवाईचा बडगा

कॉपीबहाद्दरांवर कारवाईचा बडगा
देशदूत न्यूज अपडेट

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शांततेत सुरु असलेल्या दहावीच्या परीक्षेत (SSC Exam) सोमवारी (ता.13) कॉपीचे (copy) गालबोट लागले. शिक्षण मंडळाच्या भरारी पथकांने धडक कारवाई केली.

बिजगणिताच्या (Algebra) पेपरला नंदुरबारचे (Nandurbar) तेरा आणि नाशिक जिल्ह्यातील (nashik district) नऊ असे एकूण 22 कॉपीबहाद्दरांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. प्राप्त तक्रारींवरुन काही परीक्षा केंद्रांवर (examination center) अचानक भेटी देतांना कॉपीच्या प्रकारांना अटकाव करण्यात आला. बिजगणिताच्या पेपरला मात्र नंदुरबारचे तेरा आणि नाशिकचे नऊ असे 22 कॉपीबहाद्दरांवर आढळुन आले. त्यामुळे कॉपी मुक्त परीक्षेवर परीणाम झाला. अजुन पाच पेपर बाकी आहेत.

मार्च 2023 च्या परीक्षेत यापूर्वी झालेल्या विविध विषयांच्या पेपरला फारसे गैरप्रकार आढळले नव्हते. नाशिक (nashik) व नंदुरबारला (nandurbar) एकही कॉपीचा प्रकार आढळला नसल्याची नोंद होती. तर धुळे जिल्ह्यात (dhule district) एकच कॉपीचा प्रकार नोंदविला गेला होता. परंतु काही परीक्षा केंद्रांवर आपल्या शाळेचा निकाल उंचावण्यासाठी थेट शिक्षकांकडूनच कॉपी पुरविली जात असल्याच्या

काही तक्रारी शिक्षण मंडळाला (Board of Education) प्राप्त झाल्या नंतर तक्रारींची दखल घेतांना बीजगणिताच्या पेपरला गोपनीय स्वरुपात भरारी पथके तैनात केली. कॉपी बहाद्दरांवर कारवाईचा बडगा उगारला. नाशिक विभागात झालेल्या एकूण कॉपीप्रकारांची संख्या 23 झाली आहे. बारावीच्या पेपर मध्ये कॉपीचे 41 प्रकार आता पर्यंंत राज्यात उघडकीस आले आहेत.

भूमितीच्या पेपरवर आता करडी नजर

आज बुधवारी (ता.15) भूमिती विषयाच्या पेपरवर शिक्षण मंडळाच्या पथकांची करडी नजर राहणार आहे. विभागात कुठलेही गैरप्रकार घडू नये, व कॉपी प्रकरणांवर आळा घालण्यासाठी हे पथक सज्ज असणार आहेत. तसेच यापुढील विषयांच्या परीक्षेत तक्रार प्राप्त असलेल्या परीक्षांवर लक्ष ठेवले जाणार आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com