नाशिक । Nashik (प्रतिनिधी)

नाशकात रुग्णसंख्या वाढत असली तरी मृत्युदर कमी आहे. लस उपलब्ध झाल्यावर ती नागरिकांना देण्यासाठी प्रशासनाचा ॲक्शन प्लॅन तयार आहे. लस साठवणुकीसाठी निकषानुसार योग्य स्टोरेज तयार असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.११) आढावा बैठकीनंतर भुजबळांनी पत्रकारांशी संवाद साधला. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाचे लोण आता देशात पसरत आहे. राज्यात अन्न धान्य सध्या सध्या मुबलक साठा आहे.

मात्र, आंदोलन आक्रमक झाले तर अन्नधान्य पुरवठयावर फरक पडेल. पंजाब, हरियाणातून अनेक देशात अन्नधान्य निर्यात केले जाते. त्यावर परिणाम जाणवेल.

युपीए सरकारनं दिलेल्या हमीभावाचा शेतकऱ्यांना फायदा झाला होता. खाजगीकरणं झालं तर होणारा तंटा सोडवणार कोण ? हा शेतकऱ्यांना सवाल आहे. केंद्र सरकारनं, देशाच्या भल्यासाठी हा प्रश्न त्वरीत लक्ष देऊन सोडवावा अशी भुमिका त्यांनी मांडली.

सात दिवसात फी भरा नाहीतर शिक्षण लिंक बंद करू असा वाद सुरु आहे. पण हा विषय अजून माझ्याकडे आला नाही. करोनामुळं पालक आणी शैक्षणिक संस्था दोघेही अडचणीत आहे. यात चर्चा करून तोडगा काढू असे ते म्हणाले.

पवार 'युपीए' अध्यक्ष झाले तर आनंद

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार युपीए अध्यक्षपदी अशी जोरदार चर्चा असल्या बाबत छेडले असता पवार युपीए अध्यक्ष झाले तर नक्कीच आनंद होईल. मात्र,अशी कोणतीही चर्चा अद्याप नाही. फक्त माध्यमांमध्ये ही चर्चा सुरु असल्याचे ते म्हणाले.