अनधिकृत गोठे, मंगल कार्यालये, लॉन्सवर कारवाई

अनधिकृत गोठे, मंगल
कार्यालये, लॉन्सवर कारवाई

नाशिक | Nashik

करोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या महसुलात मोठी घट झाल्याने आता पुढचे काही महिने विकास कामांवर गडांतर येणार आहे.

यामुळे महसूल वाढविण्याच्या दृष्टीने शहरातील अनाधिकृत गोठे, मंगलकार्यालये, लॉन्सवर कारवाई करण्याच्या हालचाली महापालिकेकडुन सुरू करण्यात आल्या आहे. यामुळे काही दिवसातच अनाधिकृत गोठे, मंगल कार्यालय - लॉन्स यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च ते जुन पर्यत लागु झालेल्या कडक लॉकडाऊन आणि नंतर अगदी नोव्ंहेंबर पर्यत अनलॉक टप्प्यात शासनाला मोठा अर्थिक फटका बसला आहे.

यात स्थानिक स्वराज्य संस्थांना देखील मोठा अर्थिक फटका बसला असून नाशिक महापालिकेचे घरपट्टी, पाणीपट्टी, नगर रचना विभागातील परवानगी शुल्क यासह इतर करांच्या माध्यमातून जमा होणार्‍या महसुलात लक्षणिय घट झाली आहे.

यातच करोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या उपाययोजना व रुग्णालयातील व्यवस्था यामुळे मोठा खर्च महापालिकेला करावा लागला आहे. परिणामी महापालिकेची विकास कामे ठप्प झालेली आहे.

आता महसूल वाढविण्यासाठी महापालिकेकडुन करात सवलती देण्याचे काम अभय योजनेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. आता नाशिक महापालिका प्रशासनाकडुन महसूल जमा करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलली जात आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील अनाधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात येणार आहे.

तसेच शहरातील अनाधिकृत गोठे, मंगल कार्यालये व लॉन्स यांच्यावर आता कारवाई केली जाणार आहे. या कारवाईच्या माध्यमातून ही अनाधिकृत बांधकामे व व्यावसायिक वापर अधिकृत झाल्यानंतर महापालिकेला महसूल मिळणार आहे.

असाच उद्देश ठेवून आता लवकरच प्रशासनाकडुन ही कारवाई केली जाणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com