खते बियाणे
खते बियाणे |ADMIN
नाशिक

बोगस बियाणे प्रकरणी महाबीजवर कारवाई : कृषीमंत्री दादा भुसे

चौकशी होऊन दोषी अधिकारी, कर्मचार्यांविरूध्द कारवाई केली जाईल

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्य शासनाच्या अखत्यारीत असलेल्या महाबीजसह इतर बिबियाणे, खतांच्या कंपन्यांविरोधात राज्यात ५० हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे महाबीजच्या कामाची चौकशी होऊन दोषी अधिकारी, कर्मचार्यांविरूध्द कारवाई केली जाईल असे कृषीमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात खरीप आढावा बैठकीपुर्वी आयोजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सर्व २७ जिल्ह्यात अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष जाऊन बियाणे , रासायनिक खतांच्या परिस्थितीची पाहणी केली. राज्यात ७५ तर जिल्ह्यात ७३ टक्के पेरण्या पुर्ण झाल्या आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील शेतकर्यांच्या अडअडचणी जाणून घेतल्या आहेत.

महाबीज विरोधात तक्रारी आल्यानंतर अनेक ठिकाणी पर्यायी बियाणे, खते उपलब्ध करून देण्यात आली आहेत. तर महाबीज कंपनी सरकारच्या अखत्यारीत असल्यामुळे अधिक जबाबदारीने काम करणे आवश्यक आहेत. परंतू तसे झाले नसल्यामुळे महाबीजची लवरकच सखोल चौकशी करून द्वोषींवर नक्कीच कारवाई होणार आहेत. यावर्षी २०११-१२ नंतर सोयाबीनच्या प्रथमच मोठ्या संख्येने तक्रारी अजुनही येत आहेत.

कापसानंतर सोयाबीन हे राज्यव्यापी खरीप हंगामाचे मुख्य पीक असून ही दोन्ही पिके राज्यातील ६० टक्के खरीप हंगाम व्यापुन घेतात. परंतु सोयाबीनसह सर्वच पिकांबाबत आलेल्या तक्रारींचा निपटारा करून कंपन्यांवर गुन्हे दाखल करणार आहेत. राज्य शासन कोणत्याही परिस्थितीत शेतकर्यांच्या पाठीशी उभे आहे. शेतकर्यांसाठी औजारे, शेततळ्यांसह सर्व बाबींसाठी निधीमध्ये कुठलीही कमतरता पडणार नसल्याचा निर्वाळा देखील भुसे यांनी दिला.

Deshdoot
www.deshdoot.com