नियमांचे उल्लंघन झाल्यास उद्योगांवर कारवाई -   जिल्हाधिकारी मांढरे
नाशिक

नियमांचे उल्लंघन झाल्यास उद्योगांवर कारवाई - जिल्हाधिकारी मांढरे

भरारी पथकाद्वारे आरोग्य उपाययोजनांची तपासणी

Abhay Puntambekar

सातपूर । प्रतिनिधी Satpur

करोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. आरोग्यविषयक नियमांचे पालन होते किंवा नाही याची संबंधित उद्योगांच्या विरोधात कारवाई, तपासणी करण्यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांचे एक भरारी पथक नियुक्त करण्यात आले आहे. तपासणीत नियमांचे उल्लंघन होताना आढळल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

शहराबरोबरच औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्येही करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने शासकीय यंत्रणेची चिंता वाढली आहे. दि. २० एप्रिलनंतर उद्योग सुरू करण्यासाठी निर्बंध शिथिल झाले असले तरी आरोग्य नियमांचे पालन करून उद्योग सुरू आहे. तथापि, गेल्या काही दिवसांत औद्यागिक वसाहतीत देखील काही कारखान्यांत कामगारांना करोना संसर्ग झाला आहे.

त्यामुळे आता ठोस पावले उचलण्याचा निर्णय जिल्हाधिकार्‍यांनी घेतला आहे. यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, औद्योगिक, वरिष्ठ अधिकार्‍यांचे एक भरारी पथक नियुक्त केले आहे. औद्योगिक सुरक्षा आरोग्य संचालनालय, कामगार उपायुक्त कार्यालय या कार्यालयातील हे पथक जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांना अचानक भेटी देऊन पाहणी करणार आहेत.

जे कारखाने जिल्हा प्रशासनाने करोनाविषयी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करताना आढळून आले नाहीत अशा कारखान्यांवर तत्काळ कारखाना बंद करण्याची कारवाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकार्‍यांनी दिले आहेत.

Deshdoot
www.deshdoot.com