अवैध प्रवाशी वाहनांवर कारवाई

मुंबईनाका पोलीसांची द्वारका परिसरात मोाहिम
अवैध प्रवाशी वाहनांवर कारवाई



नाशिक | Nashik
मुंबईनाका व द्वारका परिसरातून अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या वाहन चालकांवर मुबई नाका पोलीस ठाण्याच्या वतीने शनिवारी (दि 21) कारवाई सुरू केली असून यातील 13 वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

दिवाळी च्या पार्श्वभूमीवर नागरिकांची गर्दी होत असून नागरीक मिळेल त्या वाहनाने प्रवास करत आहे. वाहन चालक ही गर्दी चा फायदा घेत अवैध प्रवाशी वाहतुक करत आहे.

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी अवैध प्रवाशी वाहतूकी बाबत प्रादेशिक परिवहन विभाग कारवाई करण्यासबंधीचे पत्र दिले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात समनव्य कक्ष ही स्थापन करण्यात ला आहे. मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालय मार्फत अधाप ही अवैध वाहतुक करणार्‍या वाहनावर कारवाई होत नसताना दिसत आहे.


उपायुक्त विजय खरात व मुबई नाका वरिष्ट पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांनी मुबई नका व द्वारका परिसरात रस्तावर थांबून प्रवाशी बसवणार्‍या 13 वाहनावर कारवाई केली.

नागरिकांनी कुठल्याही प्रकारे खाजगी वाहना मध्ये बसु नये शासनाच्या बसेस , परिवहन विभागाची परवानगी असलेल्या टॅक्सी, चारचाकी मध्ये प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. त्याच प्रमाणे अश्या प्रकारे अवैध वाहतूक करणार्‍यांवर नियमित कारवाई सुरू राहणार असल्याचे उपायुक्त खरात यांनी सांगीतले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com