१८ हजार नागरिकांवर कारवाई
नाशिक

१८ हजार नागरिकांवर कारवाई

Abhay Puntambekar

नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाचा प्रकोप वाढत असताना उलट नागरिकांमध्ये निष्काळजीपणा वाढत असल्याचे शहरातील चित्र आहे. शहरात दररोज किमान शंभरावर नागरिकांवर मास्कचा वापर न केल्याने गुन्हा दाखल करण्यात येत आहे. मास्क वापर अनिवार्य करण्यात आल्यापासून आतापर्यंत १७ हजार ९५३ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

करोना रूग्णांसह करोनामुळे बळी जाणार्‍यांची संख्या वाढते आहे. अर्थकारण सुरू ठेवायचे आणि करोनाला अटकाव करण्यासाठी प्रयत्न करायचा अशी दुहेरी कसरत जिल्हा प्रशासन करीत आहे. दुर्दैवाने त्यास अद्याप यश मिळालेले नाही. त्यात करोनाला रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींकडे सर्रास दुर्लक्ष होताना दिसते आहे. सामाजिक अंतर आणि मास्क वापर याकडे नागरिकांचे दुर्लक्ष होते आहे. मास्कचा वापर न करणार्‍या नागरिकांची संख्या मोठी दिसून येते.

पोलिस गस्ती दरम्यान सरासरी दिवसकाठी शंभर नागरिकांवर कलम १८८ नुसार कारवाई केली जात आहे. एप्रिल, मे या महिन्यांमध्ये एकाच दिवसात सहाशेपेक्षा अधिक नागरिकांवर अशा प्रकारची कारवाई झाली आहे. करोनाची लक्षणे बदलत असून, आता फ्लूची कोणतीही लक्षणे आढळून येत नाही. त्यामुळे आपल्याला करोना नाही किंवा होणार नाही, या विचारातून बाहेर पडून नियमांचे पालन करणे महत्त्वाचे असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com