लॉकडाऊनमध्ये ५६ हजार नागरीकांवर कारवाई
नाशिक

लॉकडाऊनमध्ये ५६ हजार नागरीकांवर कारवाई

पोलीसांकडून नियमांची कडक अंमलबजावणी

Khandu Jagtap

Khandu Jagtap

नाशिक | Nashik

संचारबंदीचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांवर शहर पोलिसांकडून कारवाई सुरूच आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत ५६ हजार ५०२ नागरीकांवर कारवाई करण्यात आली आहे. यात वाहनचालक तसेच मास्कंचा वापर न करणारांचा समावेश आहे.

शहरात करोनाचा प्रभाव धोकादायक पद्धतीने वाढतो आहे. यामुळे लॉकडाऊन शिथिलता दिली असली तरी नियम कडक करण्यात आले आहेत. याचे उल्लंघन करणारांवर शहर पोलीसांकडून कारवाई सुरू आहे. बाजारपेठ सुरळीत करण्याचा प्रयत्न पुन्हा थांबवावा लागला. अस्थापनांच्या वेळा १० ते ७ अशी करण्यात आली असून, सांयकाळी ७ ते पहाटे ५ या वेळेत संचारबंदी नियम कडक करण्यात आले आहे. या नियमांकडे दुर्लक्ष करणार्‍यांवर शहरातील सर्व १३ पोलिस ठाण्या अंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.

मास्क न वापर करणार्‍या १८ हजार ९६९ नागरिकांवर कारवाई करण्यात आली आहे. शहरात मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. करोना रोखण्यात मास्कचा हातभार लागतो. दुर्दैवाने नागरिक याकडे सर्रास दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र शहरात दिसून येते आहे. शहर पोलिसांनी मास्कचा वापर न करणार्‍यानागरिकांवर कलम १८८ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत. २३ मार्चपासून आतापर्यंत अशा प्रकारे ५६ हजार ५०२ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

दुचाकी तसेच चार चाकी वाहन वापरण्यासाठी नवे नियम लागू करण्यात आले आहे. मात्र, वाहनचालक हे नियम डावलतात. डबल शीट प्रवास केल्या प्रकरणी ३९५ तर, विनाकारण फिरणार्‍या पाच कारचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. नाईट पॅट्रोलिंग, नाकाबंदी कडक असून, रात्रीच्या वेळी संचारबंदी नियमांचे उल्लंघन केल्याने थेट गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तसेच अशांकडून आतपार्यंत पोलीसांनी अडीच कोटी रूपयांचा दंड वसुल केला आह. नागरिकांनी सहकार्य करण्याची आवश्यकता असून, मास्कचा, वाहनांचा योग्य पद्धतीने वापर करावा असे आवाहन पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे पाटील यांनी केले आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com