सातपूर । Satpur

येथील औद्योगिक वसाहतीतील वाढते अपघात पहाता वाहतुकीस अडथळा ठरणार्या मालट्रक, कंटेनर, टेम्पो अशा एकूण 20 वाहनांवर नाशिक शहर वाहतूक शाखेच्या युनिट तीनने कारवाई केली आहे.

रस्त्यांवर पार्किंग करणार्या या गाड्यांच्या विरोधात विविध संघटनांनी पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. परंतु उशिरा का होईना वाहतूक शाखेला जाग आल्याने रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. ही कारवाई नाशिक युनिट 3 चे वाहतूक पोलिस निरीक्षक सुभाष पवार यांनी प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणांत कर्मचार्यांसह कारवाई केली.

सातपूर, अंबड इंदिरानगर या विभागामध्येही युनि कार्यरत आहे. यापुढे देखील रस्त्यांवर वाहने पार्क करून वाहतुकीला अडथळा ठरणाच्या वाहनांवर कारवाई केली. जाणार असल्याचे तसेच या वाहनांना ऑनलाइन पद्धतीने प्रत्येक वाहनास 200 रुपयाप्रमाणे दंड आकारण्यात आला असल्याचे पवार यांनी सांगितले.

या वाहनांमुळे एमआयडीसीतील कामगार व कष्टकर्यांना जिव मुठीत घेऊन जावे लागत होते. अनेक ठिकाणी अपघाताचे प्रसंग उदभवत होते. त्यामुळे नागरिकांनी व काही वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांचे कौतुक केले. कारवाई सुरुच ठेवावी, अशी मागणी होत आहे.