मनसेना शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यावर कारवाई

मनसेना शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यावर कारवाई

नाशिक | प्रतिनिधी Nashik

मनसेना पक्षप्रमुख राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray )यांनी दिलेल्या अल्टिमेटमची मुदत संपल्यानंतर मनसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या अटकेनंतर फरार असलेले दिलीप दातीर ( MNS City President Dilip Datir ) यांना पोलिसांनी अटक केल्यावर त्यांनी जामीन मिळवला. त्यानंतर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी दातीर यांना दहा दिवसांच्या तडीपारीची नोटीस काढली.

मनसेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी तिन मे पर्यंत महाराष्ट्रातील सर्व मशिदीवरील भोंगे काढावे अन्यथा चार मे पासून मशिदींसमोर दुप्पट आवाजाने हनुमान चालीसा लावली जाईल असा अल्टीमेटम राज्य शासनाला दिला होता. या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून चार तारखेच्या पहाटेच मनसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अटक सत्र सुरु केले होते. तेव्हापासून मनसेना जिल्हाध्यक्ष अंकुश पवार व शहराध्यक्ष दिलीप दातीर हे फरार होते.

गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन च्या पथकाने पाथर्डी फाटा येथे शहराध्यक्ष दिलीप दातीर यांना अटक केली व त्यांना सातपूर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. सातपूर पोलिसांनी त्यांना न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली होती. मात्र उपायुक्त सोहेल शेख यांनी दातीर यांची 18 मे पर्यंत दहा दिवसांची तडीपारीची नोटीस काढली. दरम्यान पोलिसांच्या या कारवाई संदर्भात आपण न्यायालयात दाद मागणार असल्याचे दातीर यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com