कृषी विभागाच्या भरारी पथकांची कारवाई

कृषी विभागाच्या भरारी पथकांची कारवाई

नाशिक । विजय गिते

शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्वक कृषी निविष्ठा Agricultural inputs योग्य दरात मिळाव्या,यासाठी कृषी विभाग Department of Agriculture सातत्याने प्रयत्न करत आहे. तरी देखील जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडून शेतकर्‍यांना नाडण्याचा प्रकार सतत सुरू असतो.त्यावर नियंत्रण येण्यासाठी कृषी विभागाने जिल्ह्यात 16 भरारी पथके squads निर्माण केली आहेत.

या भरारी पथकांतर्फे डिसेंबरअखेर सहा हजार नऊशे निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्यात आली.या अंतर्गत 32 परवाने निलंबित करण्यात आली असून 32 परवाणा केंद्रांना विक्री बंद आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती कृषी विभागातर्फे देण्यात आले .

शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्वक कृषी निविष्ठा योग्य दरात मिळाव्या, यासाठी जिल्ह्यात 16 भरारी पथके तयार करण्यात आलेली आहेत. ही भरारी पथके व संबंधित तालुक्यातील गुणवत्ता निरीक्षक यांनी वर्षभरात सहा हजार नऊशे निविष्ठा केंद्रांच्या तपासण्या करण्यात आल्या. त्यापैकी ज्या कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेबाबत केंद्रांमध्ये अनियमितता आढळून आली आहे, अशा एकूण 32 कृषी निविष्ठा परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

तसेच दुय्यम दर्जाच्या कृषी निविष्ठा जिल्ह्यात विक्री होत असल्याने तीन ठिकाणी पोलीस केसेस व तीन ठिकाणी जप्ती करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील गुणवत्ता निरीक्षक यांनी जवळपास 2410 कृषी निविष्ठांचे नमूने काढून ते तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

त्यापैकी 109 नमुने सदोष आढळून आले आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत असून 17 कंपन्या व विक्री केंद्र यांच्या विरोधात न्यायालयात दावे दाखल करण्यात आले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com