कारवाई करावी अन्यथा करणार तीव्र आंदोलन: आशा व गटप्रवर्तक

कारवाई करावी अन्यथा करणार तीव्र आंदोलन: आशा व गटप्रवर्तक
USER

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

कोरोना (corona) योध्या आरोग्य विभागातील (Department of Health) आशा कर्मचारी (Asha worker) रेणूका रघुनाथ तलवारे यांंना चांदवड (chandwad) पोलिसांनी तपासापोटी बोलावुन बेकायदेशिर मारहाण (beating) केली असुन त्यांच्यावर कारवाई करावी.

अन्यथा नाशिक जिल्ह्यातील (nashik district) सर्व आशा (asha) व गटप्रवर्तक (group promoter) एकत्र येऊ तीव्र आंदोलन (agitation) करतील असा् इशारा् आज निवेदनाद्वारे (memorandum) देण्यात आला. चांदवड येथे एका खासगी दवाखान्या मध्ये मोबाईलची चोरी झाली.

कोरोना काळात चांगले काम करणार्‍या आशाताई रेणूका तलवारे इंद्रायणीवाडी ता. चांदवड त्या दवाखान्यात गेलेल्याच नसतांनाही चांडवड पोलिसांनी (Chandwad Police) फोन करून बोलवले व तिथे आल्यावर तुम्ही मोबाईल चोरी केली आहे, मोबाईल भरून द्याा, अन्यथा तुमची नोकरी जाईल व गुन्हा दाखल कारण्याची सांगितले व पट्ट्याने मारहाण (beating) सुरु केली.

अशा तक्रारी आज आशा कर्मर्चा़र्‍यांनी पोलिस उपअधीक्षक माधुरी कागणे (Deputy Superintendent of Police Madhuri Kagane) व जिल्हा आरोग्य अधीकारी डॉ. नेहते यांच्याकडे केल्या. दिलेल्या वागणुकीचा आणि मारहाणीचा आयटक सलग्न महाराष्ट्र आरोग्य खाते आशा व गट प्रवर्तक संघटना निषेध केला. अमानुष मारहाण करणाऱ्या पोलीस कर्मचारी आहिरे मॅडम यांच्यावर्कठोर कारवाई करावी व घटनेची् चौकशी करुन या् घटनेची संबंधीतावर कारवाई करा.

आशा ची समाजात बदनामी झाली आहे अन्यथा नाशिक जिल्ह्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक एकत्र येऊ तीव्र आंदोलन करण्यात येईल असा् इशारा् राजू देसले सुवर्णा मेतकर, रेणुका तलवारे, शिवाजी बर्डे, वैशाली दशपुते, संगीता जाधव, निर्मला पवार, वैशाली कापडणे यांनी दिला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com