अस्वच्छतेची तक्रार आल्यास कारवाई

आढावा बैठकीत महापौर ताहेरा शेख यांचा इशारा
अस्वच्छतेची तक्रार आल्यास कारवाई

मालेगाव । प्रतिनिधी Malegaon

बकरी ईद सणाच्या ( Bakri - Eid Festival )पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता अबाधित राहावी या दृष्टिकोनातून आरोग्य विभागाने उपाययोजना कराव्यात. कुर्बानीनंतर निर्माण होणारी घाण व मांस तसेच इतर कचर्‍याची तातडीने विल्हेवाट लावण्यात (Prompt disposal of waste ) यावी. पावसाळा सुरू असल्याने अस्वच्छतेमुळे रोगराई पसरण्याची शक्यता असल्याने स्वच्छता मोहीम दररोज राबवण्यात यावी. नागरिकांच्या तक्रारी आल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट निर्देश महापौर ताहेरा शेख रशीद ( Mayor Tahera Sheikh Rashid )यांनी येथे बोलताना दिले.

बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर महापौर दालनात आज मनपाच्या सर्व विभागप्रमुखांची महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येऊन स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज, बांधकाम आदी विविध विभागांच्या कामकाजाचा प्रशासकीय आढावा घेण्यात आला.

बैठकीस आयुक्त भालचंद्र गोसावी, माजी आमदार शेख रशीद, उपायुक्त राहुल पाटील, लेखाधिकारी राजू खैरनार, सहाय्यक आयुक्त तुषार आहेर, वैभव लोंढे, अनिल पारखे, प्रभाग सभापती अब्दुल अजीज, असलम अन्सारी, शहर अभियंता कैलास बच्छाव, विद्युत अधीक्षक अभिजित पवार, अग्निशमन अधीक्षक संजय पवार, उपअभियंता सचिन माळवाळ, जयपाल त्रिभुवन, शांताराम चौरे, नगररचनाकार संजय जाधव, स्वच्छता निरीक्षक अमित सौदे, तौसीफ शेख, नीलेश पाटील, सचिन महाले आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आज बुधवारी साजरा होणार्‍या बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील स्वच्छता कायम राहावी या दृष्टिकोनातून स्वच्छता विभागाने विशेष खबरदारी घेण्याची सूचना महापौर ताहेरा शेख यांनी केली. कुर्बानीनंतर होणार्‍या कचर्‍यास नागरिकांनी मनपाने नेमून दिलेल्या ठिकाणी वाहनात टाकावे. गटारीत किंवा रस्त्यावर फेकू नये. स्वच्छता विभागानेदेखील कुर्बानीच्या कचर्‍याची तातडीने विल्हेवाट लावावी. गल्लीबोळात किंवा उघड्यावर कचरा फेकला जाणार नाही याची दक्षता घेण्यात यावी.

पावसाळा सुरू असल्याने मलेरिया विभागाने सातत्याने संपूर्ण शहरात जंतुनाशकांची फवारणी करावी, अशी सूचना करत महापौर ताहेरा शेख यांनी स्वच्छतेबाबत अधिकारी, सेवकांनी अत्यंत जागरुकतेने लक्ष द्यावे. अस्वच्छतेसंदर्भात नागरिकांच्या तक्रारी येणार नाही याची दक्षता विभागप्रमुखांनी घ्यावी. तक्रारी आल्यास संबंधितांवर कुठलाही मुलाहिजा न ठेवता कारवाई केली जाईल, असा इशारा महापौरांनी यावेळी बोलताना दिला.

संपूर्ण शहरात चार दिवस नियमित पाणीपुरवठा करण्याचे निर्देश संबंधित विभागप्रमुखांना दिले. शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करण्याबरोबर बंद असलेले पथदीप त्वरित सुरू करावेत, अशी सूचना करत महापौरांनी पावसाचे दिवस सुरू असल्याने शहरातील धोकादायक इमारती पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून शहरातील सर्व धोकादायक इमारतीधारकांना नोटिसा बजावण्यात येऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश महापौर ताहेरा शेख यांनी दिले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com