अँम्ब्युलन्सने 'ही' गोष्ट केल्यास होणार कारवाई

जिल्हाधिकारी मांढरे : परिपत्रक जारी
अँम्ब्युलन्सने 'ही' गोष्ट केल्यास होणार कारवाई

नाशिक । Nashik

रुग्णवाहिका चालकांनी आवश्यकता असल्यासच सायरन वाजवावा. विनाकारण सायरन वाजवत रुग्णवाहिका चालविल्यास सबंधित चालक व रुग्णालयाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा अंतर्गत कडक कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिला आहे.

त्या अनुषंगाने रुग्णालय व सबंधित अस्थापनांना त्यांनी पत्र जारी करुन नियमाचे पालन व्हावे असे आदेश दिले आहेत.

रुग्णांना तत्काळ उपचार सेवा मिळावी यासाठी रुग्ण वाहतूक करणार्‍या अॅम्ब्युलन्स वाहनांना लाल दिवा व सायरन्सची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. वर्दळीच्या ठिकाणी सायरनमुळे तत्काळ अॅम्ब्युलन्सला रस्ता मोकळा करुन दिला जातो.

मात्र काही अॅम्ब्युलन्स चालक रस्त्यावर आवश्यकता नसताना सायरनचा वापर करत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचा त्रास रस्त्यावरील वाहनचालकांना होतो व सायरनमुळे ध्वनि प्रदूषणातही भर पडते.

जिल्हाधिकारी व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सूरज मांढरे यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत रुग्णवाहिकांसाठी नियमांचे परिपत्रक जारी केले अाहे. त्यानूसार अॅम्ब्युलन्स चालकांनी आवश्यकतेनूसारच सायरनचा वापर करावा.

रस्त्यावर गर्दी नसताना सायरनचा अनावश्यक वापर टाळून ध्वनि प्रदूषन टाळावे. अॅम्ब्युलन्स रिकामी असल्यास तातडीच्या काॅल्सशिवाय सायरनचा वापर करु नये. सायरन सुविधेचा गैरवापर करु नये. सबंधित रुग्णालयांनी त्यांच्या अॅम्ब्युलन्स चालकांना या नियमांची माहिती द्यावी.

जर वरील नियमांचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यास सबंधित रुग्णालय व अॅम्ब्युलन्स चालकाविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायद्या भंग प्रकरणी कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com