रासायनिक खतांची जास्त दराने विक्री केल्यास कारवाई

- जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांचा इशारा
रासायनिक खतांची जास्त दराने विक्री केल्यास कारवाई

नाशिक । Nashik

खरीप हंगामाला सुरुवात झाली असून खतांचा साठा प्राप्त झाला आहे.रासायिक खतांच्या किंमतीत वाढ झाली आहे. मात्र, रासायनिक खतांच्या गोणीवर छापील किंमतीपेक्षा जास्त किंमतीने खत विक्री करू नये. वाढीव दराने खत विक्री केल्यास खत विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे यांनी दिला आहे.

केंद्र शासनाच्या एनबीएस ( न्युट्रीएंट बेस्ड सबसीडी ) पॉलिसीनुसार युरिया खत वगळता इतर रासायनिक खतांचे दर ठरविण्याचा अधिकार त्या-त्या रासायनिक खत उत्पादक कंपनीस आहे. कच्च्या मालाच्या किंमतीत वाढ झाली असा दाखला देत काही रासायनिक खत उत्पादक कंपन्यांनी डीएपी,एमओपी , एसएसपी व संयुक्त खते या खतांच्या किंमतीत वाढ केली आहे.

सद्यस्थितीत बाजारात जुन्या दाराची खते देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे रासायनिक खतांच्या गोणीवर छापलेल्या किंमती तपासून त्याप्रमाणेच रक्कम देऊन शेतकºयांनी खते खरेदी करावीत. छपाई किंमतीपेक्षा जादा किंमत आकारता येणार नाही.

रासायनिक खतांच्या काही ग्रेडच्या किंमती वाढल्या असल्या तरी जुन्या दराची खते ( जुने दर छपाई असलेल्या बॅगा ) जुन्याच दराने शेतकऱ्यांना विकणे बंधनकारक आहे. तसेच शेतकऱ्यांना पावती देणे बंधनकारक आहे. तसे निर्देश खत विक्रेत्यांना देण्यात आलेले आहेत.

कोणत्याही विक्रेता जुन्या दरातील खत वाढीव किंमत आकारून विकत असल्यास शेतकऱ्यांनी तात्काळ संबंधित तालुका कृषि अधिकारी किंवा पंचायत समिती कृषि अधिकारी यांचेकडे रीतसर तक्रार नोंदवावी किंवा जिल्हा सनियंत्रण कक्षातील जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक व मोहीम अधिकारी यांचेकडे तक्रार नोंदवावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी सोनवणे यांनी केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com