प्रतिबंधित प्लास्टिक वापरल्याने कारवाई

मनपाकडून सहा महिन्यात 600 किलो प्लॅस्टिक जप्त; 9 लाखांचा दंड वसूल
प्रतिबंधित प्लास्टिक वापरल्याने कारवाई

नाशिक | प्रतिनिधी Nashik

महापालिकेने प्रतिबंधित प्लास्टिक बंदी मोहिमेची (Prohibited plastic ban campaign) कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. मागील सहा महिन्यात एकुण 174 केसेसमधून 9 लाख पाच हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे, तर तब्बल 600 किलो प्लॅस्टिक जप्त ( Saized Plastic )करण्यात आले आहे.

प्लास्टिक पिशवी हटवूया, समृद्ध पर्यावरणाचे रक्षण करुया’ या घोषवाक्यानुसार मनपाकडून जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. हरित नाशिक-स्वच्छ नाशिक’च्या ध्येयासाठी आणि पर्यावरण रक्षणासाठी आयुक्त रमेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मनपाचा घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रभावी कामगिरी करीत आहे.

या काळात कारवाई

जानेवारी महिन्यात 35 केसेसमधून 1 लाख 95 हजार रुपये दंड आणि 86 किलो प्लॅस्टिक जप्त तर फेब्रुवारी महिन्यात 16 केसेसमधून 80 हजारांचा दंड आणि 45 किलो प्लॅस्टिक जप्त, मार्च महिन्यात 38 केसेसमधून 1 लाख 95 हजार रुपये दंड आणि 95 किलो प्लॅस्टिक जप्त, एप्रिल महिन्यात 11 केसेसमधून 55 हजार रुपये दंड आणि 22 किलो प्लॅस्टिक जप्त, मे महिन्यात 52 केसेसमधून 2 लाख 65 हजार रुपये दंड आणि 295 किलो प्लॅस्टिक जप्त, जून महिन्यात 22 केसेसमधून 1 लाख 15 हजार रुपये दंड आणि 57 किलो प्लॅस्टिक जप्त करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com