नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई

नाशिक रोड । प्रतिनिधी Nashikroad

राज्यात प्लास्टीक Plastic बंदी असताना सुद्धा काही व्यापारी आपल्या दुकानात बंदी असलेले प्लास्टीक ठेवून त्याची विक्री करतात अशी विक्री करणाऱ्या चार व्यापाऱ्यांना प्रत्येकी पाच हजार रुपये तर मास्क न घालणाऱ्या अकरा जणांना प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे एकूण 25 हजार पाचशे रुपये दंड Penalty वसूल करण्यात आला आहे.

राज्यात प्लास्टिक वापरण्यास व बाळगण्या स बंदी आहे असे असताना सुद्धा काही व्यापारी बंदी असलेले प्लास्टीक बाळगतात व त्याची विक्री करतात परिणामी अशा व्यापाऱ्यां विरुद्ध महापालिकेच्यावतीने मोहिम उघडण्यात आली आहे महापालिका आयुक्त कैलास जाधव NMC Commissioner Kailas Jadhav डॉक्टर आवेश पलोड महापालिका विभागीय अधिकारी डॉक्टर दिलीप मेनकर स्वच्छता निरीक्षक अशोक साळवे यांच्या आदेशानुसार सदरची मोहीम उघडण्यात आली प्लास्टीक बाळगणाऱ्या चार व्यापाऱ्याकडून प्रत्येकी पाच हजार रुपये प्रमाणे वीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

त्याचप्रमाणे करोनाची महामारी अद्यापही संपलेली नाही असे असताना सुद्धा काही नागरिक बिनधास्तपणे मास्क न वापरता रस्त्यात फिरतात तसेच गर्दीमध्ये वावरतात त्यामुळे करोनाचा फैलाव होण्याची शक्यता आहे अशा अकरा नागरिकांकडून प्रत्येकी पाचशे रुपये याप्रमाणे पाच हजार पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला आहे सदरच्या मोहिमेमध्ये स्वच्छता निरीक्षक विजय जाधव राजू निर्भवणे प्रवीण बिराडे मिनोल खंडारे स्वच्छता मुकदम जनार्दन घंटे रंजीत हंसराज आदी सहभागी झाले होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com