अनधिकृत वृक्षतोड विरोधात कारवाई; लाखोंचा दंड वसुल

अनधिकृत वृक्षतोड विरोधात कारवाई; लाखोंचा दंड वसुल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक शहरातील अनाधिकृत वृक्षतोडबाबत (felling of trees) नाशिक महानगरपालिकेच्या (Nashik Municipal Corporation) वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन (Tree Authority Department) वेळोवेळी कारवाई केली जाते.

नवीन वर्षात मनपाच्या पश्चिम उद्यान (garden) व वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन विभागातील वेगवेगळया आठ ठिकाणी अनाधिकृत वृक्षतोडी (Unauthorized felling of trees) बाबत आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तसेच ७ लाख ५५ हजार रुपये इतका दंड आकारण्यात आला आहे. त्र्यंबक नाका येथील व्यवसायीक तसेच बांधकाम विभागाच्या (Construction Department) ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत संबंधीत पोलीस स्टेशनद्वारे कायदेशीर कार्यवाही सुरु आहे.

उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे (Department of Parks and Trees Authority) पथक वृक्षतोडीच्या घटनांकडे लक्ष ठेवीत आहे. ही मोहीम आता आणखी कडक केली जाणार आहे. शहरातील नागरीकांनी वृक्ष छाटणी आणि वृक्ष तोडण्या करीता मनपाच्या वृक्ष प्राधिकरण विभागाकडुन रितसर परवानगी घेऊनच पुढील कार्यवाही करणे आवश्यक आहे. अन्यथा महानगरपालिकेकडून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आवाहन मनपा उद्यान व वृक्ष प्राधिकरण विभागाचे उप आयुक्त डॉ. विजयकुमार मुंडे यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com