वाहतूक नियम मोडणार्‍यांवर कारवाई : वाघ

वाहतूक नियम मोडणार्‍यांवर कारवाई : वाघ

लासलगाव । वार्ताहर Lasalgaon

लासलगाव (laslagaon) शहरात होणारी वाहतूक कोंडी (Traffic jams) लक्षात घेता लासलगाव पोलीस कार्यालयाच्या (Lasalgaon Police Office) वतीने

शहरातील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे (White stripes) मारून दुचाकी पार्किंगची व्यवस्था (Parking arrangements) करण्यात आली आहे. जे वाहनचालक या पट्टयाच्या आतमध्ये आपली दुचाकी लावणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई (Punitive action) करणार असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक राहूल वाघ (Assistant Inspector of Police Rahul Wagh) यांनी दिली आहे.

लासलगाव बाजार समितीत (Lasalgaon Market Committee) दिवसेंदिवस कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक वाढत असल्याने दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. अनेक दुचाकीस्वार रस्त्याच्या कडेला आपली दुचाकी उभी करून खरेदीकरिता निघून जातात. त्यामुळे वाहतूक कोंडी जादा प्रमाणात होत असल्याने लासलगाव पोलिसांनी रस्त्याच्या दोन्ही बाजूला सफेद पट्टे मारण्याची प्रक्रिया पूर्ण केली आहे.

वाहतूक कोंडी टाळण्याकरिता दुचाकीस्वारांनी आपली वाहने पट्टे मारलेल्या जागी लावण्याचे आवाहन लासलगाव पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. पोलिसांच्या वतीने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना केली जात असली तरी वाहन चालकांनी नियमांचे पालन करून सांगितलेल्या जागेत दुचाकी लावणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com