'त्या' वैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा

'त्या' वैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा
देशदूत न्यूज अपडेट

नाशिक | Nashik

महाशिवरात्रीच्या (Mahashivratri) दिवशी येवला तालुक्यातील पन्हाळपाटी गावातील प्रगती वाघ (वय 17) या बारावीत शिकणार्‍या विद्यार्थिनीचा सर्पदंशामुळे (snakebite) मृत्यू झाला होता. या मुलीच्या उपचारात हलगर्जीपणा करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी आणि संबंधित वाहनचालकावर आरोग्य विभागाने कारवाईचा बडगा उगारला आहे.

 या प्रकरणी राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील (Primary Health Centres) डॉ. दिलीप राठोड यांची बदली करण्यात आली आहे तर डॉ. सचिन कुठे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच, आरोग्य केंद्रातील हंगामी वाहनचालकाला कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडून देण्यात आला होता, तोही मंजुर झाला आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हर्षल नेहेते यांनी सांगितले.

दरम्यान, प्रगती वाघ ही तिच्या घरी बारावीचा अभ्यास करत असताना महाशिवरात्रीला शनिवारी (दि. 18) तिच्या पायाला तीन वेळा सर्पदंश झाला. ग्रामस्थांनीच प्रियंकाला बेशुद्ध अवस्थेत खासगी दवाखान्यात नेले. तेथून प्रियंकास उपजिल्हा रुग्णालयात नेण्यास सांगितले. राजापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात अ‍ॅम्ब्युलन्ससाठी (Ambulance) फोन केला असता वाहनचालक आजारी असल्याने अ‍ॅम्ब्युलन्स येऊ शकत नसल्याचे डॉ. सचिन कुटे यांनी कळविले. त्यामुळे नातेवाइकांनी प्रियंकाला ऑटोरिक्षाद्वारे येवला ग्रामीण रुग्णालयात हलविले.

'त्या' वैद्यकीय अधिकार्‍यांवर कारवाईचा बडगा
राज्यात शिक्षक भरतीची बंपर लॉटरी; लवकरच ३० हजार पदांची भरती

उपचारात विलंब झाल्याने प्रियंकाचा रस्त्यातच दुर्दैवी मृत्यू झाला, त्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या सीईओ आशिमा मित्तल (Zilla Parishad CEO Ashima Mittal) यांच्या आदेशानुसार जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नेहेते यांनी प्रकरणाची चौकशी करीत त्याचा अहवाल आणि कारवाईचा प्रस्ताव दिला होता. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले. 

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com