सिन्नर आगारातील एसटी सेवकांवर कारवाई

सिन्नर आगारातील एसटी सेवकांवर कारवाई

सिन्नर। विलास पाटील Sinnar

एस. टी. ST चे शासनात विलीनीकरण व्हावे यासाठी काम बंद आंदोलनात ST Employees Strike सहभागी झालेल्या सिन्नर आगारातील Sinnar Depot 50 सेवकांना आगार प्रमुख यांनी निलंबित suspended in केले असून पाच सेवकांची अन्यत्र बदली करण्यात आली आहे.

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी एस. टी. च्या सर्व सेवकांना कामावर येण्याचे आवाहन करीत सर्वांच्या मागणीवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतरही सिन्नर आगारातील कोणीही कामावर हजर झाले नाही. आगार प्रमुखांनीही सेवकांना नोटिसा पाठवून कामावर हजर होण्याचे आवाहन केले होते. मात्र, त्यासही प्रतिसाद मिळाला नाही. 2-4 सेवक मध्यंतरी हजर झाले होते. त्यातून आगारातील चार बसेस रस्त्यावर उतरल्या होत्या. मात्र, हे सेवकही हळूहळू कामावर येणे बंद झाले.

त्यामुळे टप्प्याटप्प्याने चारही बसेस बंद झाल्या. त्यातून आगाराचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान होत आहे. प्रभारी विभागीय नियंत्रक कुवर यांनी केलेल्या आवाहनानंतरही सेवक कामावर हजर झाले नाहीत. त्यामुळे आगार व्यवस्थापक भूषण सूर्यवंशी यांनी सिन्नर आगारातील 50 सेवकांवर निलंबनाची कारवाई केली आहे. त्यात चालक, वाहक यांच्यासह सेवक, लिपिक व 13 वाहतूक नियंत्रकांपैकी तिघांचा समावेश आहे.

तर कामावर हजर न झालेल्या 3 सेवकांची कळवण व 2 सेवकांची मालेगाव येथे बदली करण्याचा आदेश कुवर यांनी दिला आहे. वारंवार कामावर हजर होण्यासाठी आवाहन करूनही सेवक कामावर येण्यास तयार नाहीत. निलंबित केलेल्या तिन वाहतूक नियंत्रकांपैकी दोघे कामावर परतले तर तीन यांत्रिक सेवक कामावर हजर झाले असले तरी आगाराचे चाक चालक-वाहक नसल्याने आगरातच रुतले असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.

दरदिवशी आठ लाखांचा फटका

सिन्नर आगाराकडे 56 बसेसचा ताफा असून 196 चालक, 145 वाहक, 52-53 यांत्रिकी सेवक तर 18 क्लार्क कार्यरत आहेत. कोरोनाच्या संकटानंतर दिवाळीपूर्वी या बसेस रस्त्यावर धावू लागल्या तेव्हा सिन्नर आगाराला दररोज साडे पाच लाखांचे उत्पन्न मिळू लागले होते. दिवाळीच्या दरम्यान भाडेवाढीला मंजुरी मिळाल्यानंतर रोजचे हेच उत्पन्न आठ लाखांपर्यंत पोहोचले होते. कोरोनाची भिती कमी झाल्यानंतर एस. टी. त बसणार्‍यांची संख्याही वाढू लागली, तेव्हा एकाच दिवशी विक्रमी 12 लाखांपर्यंत उत्पन्न आगाराने मिळवले होते. जवळपास 35 दिवसांपासून सुरू असलेल्या या संपामुळे आगाराला जवळपास 3 कोटींच्या उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com