सातपूरला नियमभंग करणार्‍यांविरुद्ध कारवाई

सातपूरला नियमभंग करणार्‍यांविरुद्ध कारवाई

एक लाखावर दंड वसूल; तपासणीत दोन जण बाधित

सातपूर । प्रतिनिधी

सातपूर पोलीस ठाणे हद्दीतील सातपूर परिसरातील नागरिकांवर राज्य शासन व नाशिक मनपाने निर्देशित केलेल्या करोना नियमांचे उल्लंघन करणार्‍यांविरोधात पोलीस सतर्क झाले आहेत. नियमभंग करणार्‍यांविरुद्ध कारवाई सुरू झाली आहे. 161 जणांवर कारवाई करून 1 लाख 11 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला.

पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी करोना नियमांचे उल्लंघन करणार्‍या नागरिकांवर कारवाई करण्याबाबत सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले आहेत. त्यानुसार पोलीस उपायुक्त विजय खरात, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते व वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर परिसरातील सकाळ सर्कल, रिलायन्स पेट्रोलपंप, अशोकनगर येथे नाकाबंदी करण्यात आली. विनाकारण फिरणार्‍या 100 नागरिकांची मनपाच्या मदतीने अँटिजेन चाचणी करण्यात आली. त्यापैकी दोन नागरिक करोनाबाधित सापडले. त्यांची करोना केंद्रात रवानगी करण्यात आली आहे.

विनामास्क फिरणे, सामाजिक अंतर न पाळणे, संचारबंदीचे उल्लंघन, सार्वजनिक जागेत थुंकणे, रस्त्यावर हातगाडी, टपर्‍या उघड्या ठेवणे, ऑटोरिक्षा, खासगी वाहनचालक आदींवर कारवाई करण्यात आली.

सातपूर परिसरात विनामास्क कारवाईत 104 जणांकडून 52 हजार रुपये, सार्वजनिक जागी थुंकणे, कारवाईत 5 जणांकडून 5 हजार रुपये दंड, सोशल डिस्टन्सिंग न पाळणार्‍या आस्थापनांवर कारवाईत दोन जणांकडून 10 हजार रुपये, वेळ न पाळल्याने आस्थापनेवर कारवाई 5 हजार रुपये दंड, संचारबंदीदरम्यान 21 जणांकडून 21 हजार रुपये दंड, रोड साईड

हातगाडी व टपर्‍या कारवाई 9 जणांकडून 9 हजार रुपये दंड, सार्वजनिक वाहतूक ऑटोरिक्षा कारवाईत 7 जणांकडून 3 हजार 500 रुपये दंड, खासगी वाहतूक करणार्‍या वाहनचालकांवर 11 जणांकडून 5 हजार 500 रुपये दंड, स्व. इंदिरा गांधी भाजीमार्केट 98 कुपन वाटण्यात आले. विनामास्क कारवाई करून 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. सातपूर पोलीस ठाणे चौफुली, अशोकनगर चौक आणि रिलायन्स पेट्रोलपंप येथे नाकाबंदी ठिकाणी 100 जणांची तपासणी केली. त्यापैकी दोन जण पॉझिटिव्ह सापडले. त्यांना सीसीएस केंद्राला पाठवले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com