मनसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कारवाई

मनसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांवर कारवाई

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मनसेना अध्यक्ष राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray )यांनी दिलेला इशारा संपल्यामुळे मनसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी हनुमान चालिसा ( Hanuman Chalisa )पठण करण्याकरिता तयारी केली. मात्र पोलिसांनी रात्रीपासून मनसेना पदाधिकार्‍यांची धडपकड सत्र सुरु केली. दरम्यान, नाशिक आयुक्तालयाच्या हद्दीतून मनसेनेच्या 29 पदाधिकारी व कार्यकर्त्यांना 15 दिवसांकरिता हद्दपारीची कारवाई केली. तर मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार व शहराध्यक्ष दिलीप दातीर फरार झाले.

मनसेना पदाधिकारी व कार्यकर्ते नमाज पठणाच्या वेळी भोंग्यांवरून ( Loudspeakers )व स्पिकरवरून हनुमान चालीसा पठण करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस प्रशासनातर्फे मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नोटीस बजावण्यात आल्या होत्या. पहाटे अडीच वाजेच्या दरम्यान इंदिरानगर पोलिसांनी एका हॉटेलमधून अर्जुन वेताळ, ललित वाघ, देवचंद केदारे, नितीन माळी, मेघराज नवले, कैलास मोरे, बबलू ठाकरे, अजिंक्य शिर्के, तुषार जगताप, भूषण सूर्यवंशी, पंकज दातीर, प्रफुल्ल आपटे, राजेश परदेशी, विजय आगळे यांना अटक करून गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 15 दिवसांकरिता हद्दपार केले. तसेच त्यांनी अशा प्रकारच्या आंदोलनात सहभागी होऊ नये व ज्या ठिकाणी राहावयास जाणार आहे त्याबाबतची माहिती देण्याकरिता बंधपत्र घेण्यात आले. तसेच भद्रकाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मनसे जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर, महिला शहराध्यक्षा अरुणा पाटील, सुजाता डेरे, कामिनी दोंदे, निर्मला पवार, स्वागता उपासनी यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात उभे केले असता यांचीदेखील शहरातून 15 दिवसांकरिता हद्दपारी करण्यात आली.

तर जिल्हाध्यक्ष अंकुश पवार व शहराध्यक्ष दिलीप दातीर फरार आहेत. सातपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सचिन सिंन्हा, अतुल पाटील, विशाल भावले, विजय आहिरे, मिलिंद कांबळे, योगेश लभडे, योगेश शेवरे, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, शहराध्यक्ष दिलीप दातीर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना आज ( दि. 5 ) न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Related Stories

No stories found.