अवैध गोवंश वाहतुक करणार्‍यांवर कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

अवैध गोवंश वाहतुक करणार्‍यांवर कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त

मालेगाव । प्रतिनिधी | Malegaon

कत्तलीसाठी (slaughter) पिक अप वाहनातून अवैधरित्या गोवंश शहरात आणण्याचे प्रकार (illegal cattle trafficking) सुरूच असल्याचे

गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले आहे सलग दोन दिवसात दोन पिक अपसह गाई व गोवंश जनावरे असा सुमारे 12 लाख 82 हजाराचा मुद्देमाल तालुका पोलिसांनी (police) जप्त करत वाहतूक (transport) करणार्‍या चालकांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत.

येथील गोरक्षक मच्छिंद्र शिर्के यांना बोलेरो पिक-अप एम एच 41 ए यु 5180 मधून लखमापूर निंबोळा सौंदाणे मार्गे महामार्गावरून कत्तलीसाठी गोवंश जनावरे (Cattle for slaughter) आणली जात असल्याची माहिती मिळाल्याने शिर्के यांच्यासह बुरा सूर्यवंशी बापू सूर्यवंशी विलास जगताप यांनी पाटणे फाटा जवळ सापळा रुचून सदर पिक अप वाहन थांबवले असता त्यात गोवंश जनावरे कोंबलेल्या अवस्थेत दिसून आली.

सदर जनावरे कत्तलीसाठी कसाही कडे नेली जात असल्याची माहिती चालकाकडून मिळतात याची माहिती गोरक्षकांनी तालुका पोलिसांना दिली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहना सह जनावरे असा सुमारे दहा लाख वीस हजाराचा मुद्देमाल जप्त केली याप्रकरणी शिर्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गोवंशाची वाहतूक करणार्‍या अमोल सुदाम पवार व दत्तू बापू वाघ दोन्ही राहणार लखमापूर यांच्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल (Filed a case) केला आहे.

दुसर्‍या घटनेत निंबोळा रोडवरील दौलत नगर चौफुली जवळ कत्तलीसाठी अवैधरित्या गोवंशाची वाहतूक (Illegal transportation of cattle) करणारी पीक-अप वाहन अपघात ग्रस्त होऊन रस्त्याच्या खाली जागांमध्ये जाऊन अडकले होते. या घटनेची माहिती मिळतात गोरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. या वाहनात देखील गाई व वासरू बांधून ठेवलेल्या अवस्थेत दिसून आले तर वाहनाच्या बाजूस काही जनावरे उभी होती.

या गोवंशांची चौकशी केली असता शेख राहुल शेठ महेबुब याने सदर जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचे सांगितल्याने. गोरक्षकांनी पोलिसांना पाचारण केले पोलीस आल्याचे पाहताच शेखच्या तिघा साथीदारांनी पलायन केले. पोलिसांनी गोवंश जनावरांसह वाहन असा सुमारे दोन लाख 62 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शिर्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख राहील व त्याच्या तिघा साथीदारांविरुद्ध प्राणी संरक्षण कायद्यान्वये (Animal Protection Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे अधिक तपास हवा सचिन गायकवाड हे करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com