महापालिकेत अकरा जणांवर कारवाई

महापालिकेत अकरा जणांवर कारवाई
Corona

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शासनाने करोनाच्या corona नियमात शिथिलता दिली असली तरी त्रिसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी सक्तीने सुरू आहेत. तोंडावर मास्क, Mask सतत सॅनेटायजरचा वापर व सामाजिक अंतर हे नागरिकांनी करायलाच पाहिजे. याबाबत दंडात्मक कारवाई देखील सुरू असून महापालिका मुख्यालयात विना मास्क फिरणार्‍या अकरा जणांवर प्रशासनाने कारवाई करून दंड वसूल केले आहे. यामध्ये महापालिका सेवकांचाही समावेश आहे. यामुळे महापालिकेत येतांना मास्क तपासून घ्या, अशी म्हणायची वेळ आली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर मनपा मुख्यालयात कामानिमित्त आलेले नागरिक व सेवक असे एकूण 11 जणांनी मास्क परिधान न केल्यामुळे त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी दिली आहे. शासनाने सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी, कर्मचारी व नागरिक यांना मास्क परिधान करणे बंधनकारक केले आहे.

या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी अतिरिक्त आयुक्त खाडे यांना याबाबत निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने मनपा मुख्यालयाच्या इमारतीतील सर्व मजल्यांवरील विभागांमध्ये व परिसरात भेटी देऊन पाहणी केली असता शासन निर्देशानुसार विविध विभागातील तसेच मनपा मुख्यालयात कामानिमित्त आलेले नागरिक असे एकूण 11 जणांनी मास्क परिधान केले नसल्याचे आढळून आले.

या सर्वांकडून प्रत्येकी पाचशे रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच मनपाच्या सर्व कार्यालयांमध्ये कामानिमित्त येणारे नागरिकांनी करोना संदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करून कार्यालयात मास्क परिधान करावे, या पार्श्वभूमीवर पाहणीच्या वेळी मास्क परिधान केले नसल्याचे आढळून आल्यास संबधीत अधिकारी कर्मचारी व नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे सुरू राहणार आहे. तसेच मनपाची सर्व विभागीय कार्यालये उपकार्यालये याठिकाणी या अनुषंगाने अचानक भेटी दिल्या जाणार असल्याचे अतिरिक्त आयुक्त खाडे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com