Photo Gallery : नियमांचे उल्लंघन केल्यामुळे नागरिकांवर कारवाई

अंबड पोलिसांची कारवाई; रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना दिला लाठीचा प्रसाद
Photo Gallery : नियमांचे उल्लंघन केल्यामुळे नागरिकांवर कारवाई

नवीन नाशिक । प्रतिनिधी

अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी सकाळी भेट देऊन विशेष पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचार्‍यांचे मनोबल वाढवले. या पार्श्‍वभूमीवर दुपारपासून पोलिसांनी कारवाईत घेतल्याचे दिसून आले.

अंबड पोलिसांनी नवीन नाशकातील राणेनगर, लेखानगर, शिवाजी चौक, सावता नगर, दिव्या अ‍ॅ‍ॅडलाब कॉर्नर, माऊली लॉन्स, खुटवड नगर ,संजीव नगर आदी परिसरात विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांना लाठीचा प्रसाद दिला.

ही मोहीम अंबड पोलिस ठाण्याचे वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक कमलाकर जाधव, श्रीकांत निंबाळकर, महिला पोलीस रुपाली देवरे, स्वाती ढगे, अंमलदार संजीव जाधव, अशोक आव्हाड, नवनाथ काकड, योगेश रेवगडे, प्रशांत नागरे, जितेंद्र वझीरे, मुकेश गांगुर्डे आदींसह पोलीस ठाण्याच्या अमलदारांनी राबविली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com