प्लॅस्टिक पिशव्या वापरणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई

प्लॅस्टिक पिशव्या वापरणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई

पिंपळगाव ब.। प्रतिनिधी | Pimpalgaon Baswant

माझी वसुंधरा, स्वच्छ पर्यावरण या आणि इतर अनेक उपक्रमातून संपूर्ण राज्यात प्लास्टिक पिशव्यांवर (Plastic Bag) बंदी (ban) घालण्यात आलेली आहे.

तरीही पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Baswant) शहरात प्लास्टिक पिशवीचा (plastic bag) मोठ्या प्रमाणात वापर होतांना दिसत असल्याने ग्रामपंचायत प्रशासनाने शहरातील मिठाईच्या दुकानांवर कारवाई करत लाखोंच्या प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. या कारवाईत 9 दुकानांचा समावेश असून प्रत्येकी 5 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

पिंपळगाव ग्रामपालिकेकडून गेल्या काही दिवसांपासून प्लास्टिक बंदीची (Plastic ban) जनजागृती करण्यात आली होती. व्यावसायिकांना ग्रामपंचायतीकडून प्लास्टिक विक्री न करण्याबाबत नोटिसा (notice) देखील बजावण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे नागरिकांचे प्रबोधन देखील करण्यात आले होते, तरी देखील प्लास्टिकची सर्रास विक्री होत असल्याने ग्रामपालिकेकडून ही कारवाई करण्यात आली.

यापुढील काळातही प्लास्टिक पिशव्या वापरणार्‍या व विक्री करणार्‍या दुकानांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम (Village Development Officer Lingaraj Jangam) यांनी या कारवाई नंतर सांगितले. यापूर्वीही तीन लाखांच्या वर प्लास्टिक माल जप्त करण्यात आला आहे.

प्लास्टिकचा वापर सुरूच

शहरात आता प्लास्टिक पिशव्या, एकदाच वापरल्या जाणार्‍या वस्तू म्हणजेच ताट, प्लेट्स, ग्लास, वाटी, चमचे, भांडे, हॉटेलमध्ये अन्नपदार्थ पॅकिंगसाठी वापरल्या जाणार्‍या वस्तू द्रवपदार्थ साठवण्यासाठी वापरात येणारे पाऊच तसेच वेष्टणे यांच्यावर आता बंदी आहे. असे असताना देखील आजही भाजीपाला विक्रेते, चहा टपरी, किराणा दुकाने या ठिकाणी राजरोस सिंगल युज प्लास्टिकचा वापर होतांना दिसत आहे.

प्लास्टिक मुक्तीसाठी सहकार्य करावे

प्लास्टिक बंदीची मोहीम यशस्वी व्हावी यासाठी शहरातील सामाजिक संस्था, सेवाभावी मंडळे यांनी प्लास्टिक बंदी जनजागृती मोहिमेत सहभागी गौण आपले संपूर्ण शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी ग्रामपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन ग्रामपालिका प्रशासनाने केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com