नियम न पाळणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई

नियम न पाळणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई

येवला | प्रतिनिधी | Yeola

शहरात नगरपालिकेने (Yeola Municipality) वारंवार आवाहन करूनदेखील काही व्यावसायिक (Businessman) नियम पाळत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर करोना (Corona) नियम न पाळणार्‍या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई (Action) करण्यात आली आहे...

जिल्हाधिकारी, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या आदेशानुसार नाशिक जिल्ह्यात (Nashik District) काही प्रमाणात निर्बंध लागू करण्यात आले होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून शहरात नगरपालिकेने वारंवार आवाहन करूनदेखील काही व्यावसायिक नियम पाळत नव्हते.

येवल्याची बाजारपेठ रात्री उशिरापर्यंत सुरू राहत होती. हे पालिकेच्या निदर्शनास आल्यानंतर मुख्याधिकारी संगीता नांदुरकर (Sangeeta Nandurkar), उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणकुमार पाटील (Praveenkumar Patil) यांच्या नेतृत्वाखाली भरारी पथक नेमून नियम न पाळणार्‍या व्यावसायिकांवर कारवाईचा आदेश दिले होते. त्यानुसार पालिकेने धडक कारवाईला सुरुवात केली आहे.

शहरातील हॉटेल बजरंग १ हजार रुपये, हॉटेल साई ५ हजार रुपये, पूजा ज्वेलर्स ५ हजार रुपये, रेमंड टेलर शॉप २ हजार रुपये, फत्तेबुरुज नाका येथील जिम ५ हजार रुपये, असा दंड वसूल करण्यात आला.

येवला शहर करोनामुक्तीसाठी ही कारवाई सुरूच ठेवण्यात येणार असल्याची माहिती पालिकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीणकुमार पाटील यांनी दिली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com