
उमराणे | वार्ताहर | Umrane
आचार्य श्री देवनंदीजी महाराज यांच्या प्रेरणेने भव्य दिव्य अद्वितीय असे नमोकार तीर्थ निर्माण झाले आहे. हे तीर्थ विश्वशांतीसाठी जगात प्रसिद्ध होईल. आचार्यांचे तुम्ही घरी बसून ध्यान करा, तुमचे सर्व कार्य यशस्वी होतात. ते संत नसून आमचे खरे देवेंद्र आहेत, असे उद्गार माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केले...
नमोकार तीर्थ येथे भगवान महावीर जिनबिंब पंचकल्याणक महोत्सव व विश्वशांती यज्ञाच्या उदघाटन कार्यक्रमात बोलत होते.
खैरे पुढे म्हणाले की, नमोकार तीर्थसाठी जेही कार्य असेल मी स्वतः येऊन पूर्ण करेल. मला गुरूंनी आदेश करावा व २०२५ मध्ये होणाऱ्या भव्यदिव्य वैश्विक पंचकल्याणक कार्यक्रमात पाच दिवस सेवा देणार आहे असेही सांगितले.
पंचकल्याणक महोत्सवाचे उद्घाटन खासदार खैरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. आज सकाळी 1008 श्री महावीर भगवान यांच्या प्रतिमेचा महामस्तभिषेक देवाज्ञा, आचार्य निमंत्रण, घटयात्रा, मंडपशुद्धी व उद्घाटन इंद्र प्रतिष्ठा आदी धार्मिक कार्यक्रम झाले.
तसेच देवनंदीजी महाराज यांचे प्रवचन झाले. नमोकार तीर्थ ट्रस्टचे अध्यक्ष नीलम अजमेरा, बालब्रम्हचारीणी वैशाली दीदी, तिर्थरक्षा कमेटीचे राजाध्यक्ष अनिल जमगे, महोत्सव समितीचे अध्यक्ष विजय कासलीवाल, संतोष काला यांची भाषणे झाली.
पाच दिवसीय महोत्सवात माता पिता होण्याचा बहुमान विजय प्रकाशचंद पहाडे, सौधर्म इंद्र बनण्याचा मान रचना जयकुमार जैन, कुबेर इंद्र बनण्याचा मान भावना संतोष काला, चक्रवर्ती बनण्याचा मान मोनिका सजग जैन, ईशान इंद्र बनण्याचा मान अनिता हुकुमचंद पाटणी, महायज्ञ नायक बनण्याचा मान पुष्पा विजकुमार कासलीवाल, सनतकुमार इंद्र बनण्याचा मान राखी बबलू पहाडे, माहेंद्र इंद्र बनण्याचा बहुमान पूजा दीपक गंगवाल यांना मिळाला आहे.