
नाशिक । प्रतिनिधी । Nashik
नाशिक विभागातील (Nashik division) पाच जिल्ह्यांमध्ये लिपीकांसाठी (Clerk) ५० दिवसांचे महाराष्ट्र लेखा लिपीक प्रशिक्षण (Maharashtra Accounts Clerk Training) अभ्यासक्रमांतर्गत लेखा विषयक प्रशिक्षणाचे (Accounting training) आयोजन करण्यात आले आहे. या प्रशिक्षण सत्रासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय लिपीकांनी प्रवेश घ्यावा, असे आवाहन जिल्हा लेखा व कोषागारे विभागाचे सहसंचालक (Joint Director, District Accounts and Treasury) निलेश राजूरकर (Nilesh Rajurkar) यांनी केले आहे.
राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या (Department of General Administration) २४ जून २०१५ च्या शासन निर्णयानुसार सर्व शासकीय कर्मचारी व नवनियुक्त कर्मचारी यांना प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. या अनुषंगाने शासनाच्या वित्त विभागांतर्गत विभागीय सहसंचालक (Divisional Joint Director) लेखा व कोषागारे (Accounts and treasury) नाशिक विभाग यांच्यामार्फत १३ जून २०२२ ते २५ ऑगस्ट २०२२ या ५० दिवसांचा कालावधीत अभ्यासक्रम सुरू करण्यात येत आहे.
यासाठी नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर व नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयीन प्रमुखांनी आपल्या कार्यालयातील लिपीक वर्गीय कर्मचारी यांना प्रशिक्षणासाठी पाठविण्यात यावे, असे सहाय्यक संचालक (Assistant Director) देवराव म्हस्के (Devrao Mhaske) यांनी सांगितले आहे.
या प्रशिक्षणांतर्गत संपूर्ण ५० दिवसांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेणे आवश्यक असून यामध्ये लेखा, वित्त व शासनाच्या विविध संगणक प्रणालीचा (Computer System) समावेश करण्यात आला आहे. तसेच कर्मचाऱ्यांना पूर्ण वेळ पाठविणे शक्य नसल्यास विशिष्ट सत्रासाठी प्रवेश घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
या प्रशिक्षणाबाबतचा निश्चित केलेला तपशिलवार अभ्यासक्रम कोषागार अधिकारी (Treasury Officer) नाशिक (Nashik) धुळे (Dhule) जळगाव (Jalgaon) अहमदनगर (Ahmednagar) व नंदुरबार (Nandurbar) या जिल्ह्याच्या कोषागार कार्यालयात माहितीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे, असेही जिल्हा लेखा व कोषागारे विभागाचे सहाय्यक संचालक (Assistant Director, District Accounts and Treasury) श्री. म्हस्के यांनी कळविले आहे.