पक्षी गणनेनुसार नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात आहेत 'इतके' पक्षी

वनविभाग, गाईड, स्वयंसेवक व पक्षी मित्रांच्या मदतीने पक्षी गणना
पक्षी गणनेनुसार नांदूरमध्यमेश्वर अभयारण्यात आहेत 'इतके' पक्षी

निफाड। प्रतिनिधी Niphad

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात (Nandurmadhyameshwar Bird Sanctuaries) या हंगामातील दुसर्‍या मासिक पक्षी प्रगणनेत (Bird counts) 16613 पक्षांची नोंद करण्यात आल्याची माहिती नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्याचे वनक्षेत्रपाल शेखर देवकर, वनपाल प्रितीश सरोदे यांनी दिली आहे.

दरवर्षी हिवाळा सुरु होताच देश-विदेशातील पक्षी (Bird) हजारो किलोमीटरचा प्रवास करीत नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात दाखल होतात. वनविभागाच्या (Forest Department) वतीने येथे पक्षांच्या अधिवासासाठी व पक्षी निरीक्षणासाठी नानाविध सुविधांची निर्मिती केली आहे. करोना (corona) प्रादूर्भावामुळे मागील दोन वर्ष हे अभयारण्य पर्यटकांसाठी (Sanctuary tourists) व पक्षीप्रेमींसाठी बंद ठेवण्यात आले होते.

मात्र आता करोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्याने हे अभयारण्य पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. यावर्षी थंडीची (cold) चाहूल लवकर लागल्याने देश-विदेशातील पक्षी मोठ्या प्रमाणात अभयारण्यात दाखल होत आहे. परिणामी वनविभागाच्या वतीने या हंगामातील दुसरी मासिक पक्षी प्रगणना नुकतीच पूर्ण करण्यात आली. करोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्स (Social distance) पाळत व मास्क (mask) वापरून ही पक्षी प्रगणना चापडगाव, मांजरगाव, खानगाव थडी, गंंगा मध्यमेश्वर, गोदावरी नदीपात्र, कोठुरे, कुरूडगाव, काथरगाव अशा एकूण 7 ठिकाणी करण्यात आली.

त्यासाठी वनविभागाने गट तयार करून प्रत्येक गटाला विशिष्ट परिसर नेमून देण्यात आला होता. या पक्षी निरीक्षणात विविध पानपक्षी, झाडावरील, गवताळ भागातील पक्षी असे 13567 पाणपक्षी व 3046 झाडावरील, गवताळ भागातील असे एकूण 16613 पक्षांची नोंद करण्यात आली आहे. या प्रगणनेत देश-विदेशी स्थलांतरीत पक्षांची नोंद झाली असून यात प्रामुख्याने फ्लेमिंगो (Flamingo), ऑस्प्रे (Osprey), कॉमन क्रेन (Common crane),

नॉर्यन शॉवलर, पिनटेल, गार्गनी, युरेशियन, व्हिजन, गडवाल, रूडी शेल डक, मार्श हॅरियर, मॉन्टेग्यु हॅरियर, ब्लु थ्रोड, ब्लु चिक बी ईटर, गोल्डन प्लॉवर तसेच स्थानिक व स्थलांतरीत पक्षांमध्ये उघड्या चोचीचा बगळा, जांभळा बगळा, राखी बगळा, स्पॉट बीलडक, स्पुनबिल, रिव्हीर टर्न, प्रॉन्टिकोल, कमळ पक्षी, शेकाट्या, नदीसूरय आदी पक्षी आढळून आले आहेत.

थंडीच्या आगमनाबरोबरच अधिक स्थलांतरित पक्षाचे आगमन झाल्याने पर्यटक व पक्षीप्रेमींना पक्षी निरीक्षणाचा आनंद घेता येणार असून जसजसी थंडीचा माहोल वाढत जाईल तसतशी पक्षांची संख्या देखील वाढत जाणार असून मार्च महिन्यापर्यंत नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य पक्षांसह पर्यटकांनी गजबजणार आहे.

नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्यात या हंगामातील नुकत्याच झालेल्या दुसर्‍या पक्षी प्रगणनेत नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याचे सहाय्यक वनसंरक्षक विक्रम आहिरे, वनपरिक्षेत्र अधिकारी शेखर देवकर यांचे मार्गदर्शनाखाली वनपाल प्रितीश सरोदे, वनरक्षक संदिप काळे, श्रीमती. आशा वानखेडे, वनमजूर ज्ञानेश्वर फाफाळे, पक्षी मित्र आनंद बोरा,

अनंत सरोदे, अमोल डोंगरे, किशोर वडनेरे, किरण अडसरे, अभयारण्यातील गाईड अमोल दराडे, शंकर लोखंडे, प्रमोद दराडे, पंकज चव्हाण, ओंकार चव्हाण, रमेश भराडे, गंगाधर आघाव, सुनील जाधव, प्रमोद मोगल, एकनाथ साळवे, संतू गायकवाड, विकास गारे, ओमकार सोनवणे, अजय पावडे, आयुष अडसरे आदींसह अभयारण्यातील गाईड, पक्षीमित्र सहभागी झाले होते.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com