समृद्धी महामार्गावर अपघात; दोन प्रवासी जखमी

समृद्धी महामार्गावर अपघात; दोन प्रवासी जखमी

सिन्नर। प्रतिनिधी sinnar

समृद्धी महामार्गाच्या दुसऱ्या टप्प्यावर वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात दोन प्रवासी जखमी झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली.

समृद्धी महामार्ग नागपूर ते मुंबई लेनवर 543.2 किमी येथे शिर्डी बाजू कडून मुंबई बाजूकडे जाणाऱ्या अज्ञात वाहनास पाठीमागून जाणारी फोर्ड कंपनीची आयकॉन कार हिने पाठीमागून धडक देऊन अपघात झाला. अपघातात कार मधील कृष्णा महेश भोईर (18) व महेश भोईर वय (45) राहणार ठाणे बोरबंदर रोड हे किरकोळ जखमी झाल्याने त्यांना रुग्णवाहिकेतून सिन्नर येथ शासकीय रुग्णालयात नेण्यात आले.

महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक सुनील गायकवाड व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य राबविले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com