लॉकडाऊन असूनही अपघात संख्या वाढली

मागील लॉकडाऊनच्या तुलनेत दुप्पट मृत्यू
लॉकडाऊन असूनही अपघात संख्या वाढली
USER

नाशिक । Nashik

शहर तसेच जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक असून लॉकडाऊनचे कडक निबर्ंध असतानाही रस्त्यांवरील वाहनसंख्या मोठी आहे. परिणामी लॉकडाऊन असतानाही शहरात अपघात व मृत्युची संख्या वाढत आहे.

मागील वर्षीच्या लॉकडाऊनच्या कालावधीपेक्षा हा आकडा दुप्पट आहे. जानेवारी ते आपार्यंत 170 अपघात झाले असून 57 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 165 जण जखमी आहेत.

मागील वर्षी मार्च 22 पासून लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर रस्त्यांवर अत्यावश्यक सेवेचीच वाहने दिसत असल्याने तसेच शहरात कडक अंमलबजावणी असल्याने रस्त्यांवर वाहने अगदी तुरळक दिसत होती. परिणामी मार्चपासून नोव्हेंबर या सहा ते सात महिन्याच्या कालावधीत केवळ 155 अपघात झाले होते. तर केवळ 60 जणांचा मृत्यू झाला होता. त्या तुलनेत जानेवारी पासून ते एप्रिल या अवघ्या चार महिन्याच्या कालावधीतच शहरात तीतकेच अपघाती मृत्यू झाले आहेत.

चालू वर्षी प्रारंभी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने लॉकडाऊनचे निर्बंध शिथील झालेले होते. यामुळे वाहतुक नेहमी प्रमाणे सुरू होती. फेब्रुवारीपासून कारोनाचा प्रादुर्भाव वाढिस सुरूवात झाली तरी कडक निर्बंध लादण्यास मार्च उजाडला परिणामी कारोना वाढलाच परंतु आता उद्रेक सुरू असतानाही तसेच लॉकडाऊनचे कडक निर्बंध असूनही शहरातील रस्त्यांवरील वाहनसंख्या मोठ्या प्रमाणात आहे.

अद्यापही सिग्नलवर गर्दी होत असल्याचे चित्र आहे. तसेच त्या तुलनेत रस्ते मोकळे असल्याने भरधाव वाहने पळवण्याचे प्रमाणही मोठे असल्याने अपघात होत आहेत. चालू वर्षी मार्च मध्ये सर्वाधिक 52 अपघात झाले ओत. तर एप्रिल मध्ये सर्वात कमी 25 अपघात नोंदवले गेले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com