येवला तालुक्यावर शोककळा; जवानाचे अपघाती निधन

येवला तालुक्यावर शोककळा; जवानाचे अपघाती निधन

येवला | प्रतिनिधी | Yeola

तालुक्यातील मानोरी खडकी माळ (Manori Khadki Mal) येथील जवानाचे अपघाती निधन झाल्याची दु:खद घटना घडली आहे. या घटनेमुळे येवला तालुक्यावर शोककळा पसरली आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, अजित गोरख शेळके असे निधन झालेल्या जवानाचे (Soldier) नाव असून ते राजस्थान येथे ५४ आरमाड बटालियनमध्ये कर्तव्यावर होते. होळीच्या (Holi) दिवशी ते कर्तव्य बजावून आपल्या रूमवर परतत असताना त्यांच्या मोटरसायकलला भीषण अपघात (Accident) झाला होता. या अपघातात शेळके गंभीर जखमी झाले होते.

येवला तालुक्यावर शोककळा; जवानाचे अपघाती निधन
सातपूरला युवकावर गोळीबार

या अपघातानंतर त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना तातडीने सैन्याच्या रुग्णालयामध्ये (Hospital) दाखल केले होते. मात्र,रुग्णालयात उपचार सुरू असतानाच काल सायंकाळच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

येवला तालुक्यावर शोककळा; जवानाचे अपघाती निधन
Nashik : 'त्या' मारहाण प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

त्यानंतर काल मध्यरात्रीच्या सुमारास शहीद (Martyr) जवान अजित शेळके यांचे पार्थिव (Earthly) येवल्यातील त्यांच्या मानोरी या मूळगावी सैन्यदलाच्या वतीने पाठविण्यात आले असून त्यांच्यावर उद्या (दि.२०) मार्च रोजी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

दरम्यान, शेळके यांच्या निधनानंतर राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा येवल्याचे आमदार छगन भुजबळ (MLA Chhagan Bhujbal) यांनी आपला शोकसंवेदना (Condolence) व्यक्त केल्या आहेत.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com