प्रेस कामगार नेत्याच्या मुलाचे रशियात अपघाती निधन

प्रेस कामगार नेत्याच्या मुलाचे रशियात अपघाती निधन

नाशिकरोड | प्रतिनिधी | Nashik Road

येथील इंडिया सेक्युरिटी प्रेसमधील (India Security Press) कामगार नेते डॉक्टर चंद्रकांत हिंगमिरे यांचा मुलगा ओंकार हिंगमिरे याचा रशियात (Russia) अपघाती मृत्यू (Accidental Death) झाल्याची दुर्दैवी घटना घडली असून या घटनेमुळे प्रेस कामगारांमध्ये व नाशिकरोड परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे...

याबाबत अधिक माहिती अशी की, डॉ. चंद्रकांत हिंगमिरे हे सिक्युरिटी प्रेसमधील कामगार पॅनलचे नेते असून सध्या ते वर्क्स कमिटीचे व्हाईस चेअरमन आहेत. त्यांचा मुलगा ओंकार हा गेल्या चार वर्षापासून रशिया येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. वैद्यकीय शिक्षण (Medical Education) घेण्याचे हे त्याचे शेवटचे वर्ष होते व पुढील वर्षी ओंकार हा भावी डॉक्टर म्हणून ओळखला जाणार होता.

मात्र, दुर्दैवाने त्याचा रशिया येथे मृत्यू झाल्याने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रेस कामगार नेते जगदीश गोडसे व ज्ञानेश्वर जुंद्रे यांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com