
निफाड | प्रतिनिधी | Niphad
कारचे टायर फुटून झालेल्या अपघातात (Accident) निर्यातदार कंपनीच्या तरूण व्यवस्थापकाचा मृत्यू (Death) झाल्याची घटना शनिवारी (दि.२५) रोजी रात्रीच्या सुमारास ओझर (Ozer) येथील महामार्गावर घडली. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये ( Farmers) हळहळ व्यक्त केली जात आहे...
याबाबत अधिक माहिती अशी की, एमजीई द्राक्ष निर्यातदार कंपनीचे व्यवस्थापक रोहित शिवनकर (वय ३५, रा. पिंपळगाव बसवंत, मूळ गाव सातारा) शनिवारी रात्री आपल्या होंडा सिटी कारने (एमएच १५ एफ.टी ८४५३) नाशिकहून पिंपळगाव बसवंतकडे (Nashik to Pimpalgaon Baswant) निघाले होते. त्यांची कार ओझर येथील रिलायन्स पेट्रोल पंपासमोर आली असता कारचे टायर फुटल्याने कार थेट दुसऱ्या लेनवर जाऊन पिंपळगावहून नाशिककडे जाणाऱ्या ट्रकवर आदळली.
तसेच हा अपघात इतका भीषण होता की, ट्रकने कार काही अंतरावर फरफटत नेली. तसेच या दुर्घटनेत शिवनकर यांचा जागीच मृत्यू झाला असून घटनेनंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, शिवनकर यांनी पिंपळगाव बसवंत परिसरातील सेवन स्टार या द्राक्ष निर्यातदार (Grape exporter) कंपनीत सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कामाला सुरुवात केली होती. त्यानंतर ते लोणवाडी-दावचवाडी शिवारातील एमजीई या द्राक्ष निर्यातदार कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम पाहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तर ओझर पोलीस ठाण्यात (Ozar Police Station) अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू आहे.