नाशिकच्या लष्करी जवानाचे अपघाती निधन

नाशिकच्या लष्करी जवानाचे अपघाती निधन

सिन्नर | Sinnar

सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) ठाणगाव (Thangaon) येथील जवान अमोल विलास शिंदे (२४) (Amol Shinde) यांचे अपघाती निधन (Accidental death) झाले आहे.

सिन्नर-ठाणगाव रस्त्यावर आटकवडे शिवारात हा अपघात झाला. चार-पाच दिवसांपूर्वी ते सुट्टीवर आलेले होते. वैयक्तिक काम आटोपून मोटारसायकलने सिन्नर येथून ठाणगावकडे निघाला होते.

हा अपघात नेमका कसा झाला हे समजू शकलेले नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. अमोल सध्या पश्चिम बंगाल येथे कर्तव्य बजावत होते.

जवान अमोल यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, चुलते, चुलती असा परिवार आहे. या घटनेने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com