देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात; महिला गंभीर जखमी

देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात; महिला गंभीर जखमी

दहिवड | वार्ताहर | Dahiwad

सप्तशृंगी देवीच्या (Sapthasringi Devi) दर्शनाला जाणाऱ्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज घडली. सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी खानदेशातीलभाविक एका अँपे रिक्षाने नंदुरीकडे जात असताना देवळा सौंदाणे रस्त्यावर खुंटेवाडी शिवारात जनार्दन स्वामी कुटीजवळ अपघात (accident) झाला.

चैत्र पौर्णिमेनिमित्त सप्तशृंगी देवीचा यात्रा उत्सव सुरू असून खानदेशातील धुळे, जळगाव, नंदुरबार आदी जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात भाविक देवीच्या दर्शनासाठी पायी तसेच विविध वाहनाने येत असतात.

देवीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनाला अपघात; महिला गंभीर जखमी
'त्या' हत्या प्रकरणातील फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात

आज मंगळवार दिनांक ४ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास देवळा सौंदाणे रस्त्यावर खुंटेवाडी गावाच्या हद्दीत जनार्दन स्वामी महाराज कुटीजवळ मालेगावहून सप्तशृंगी गडाकडे जात असलेली अँपे रिक्षास (Appe Rickshaw) (एमएच १९ सीडब्ल्यू ३३६२) देवळयाकडून मालेगावच्या दिशेने टोचन करून जात असलेल्या मॅक्झिमो (Maximo) गाडीने (एमएच ४१ एजी १६५६) समोरून धडक दिली.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

त्यात भाविकांनी भरलेली ॲपे रिक्षा रस्त्याच्या बाजूला पलटी झाली. या अपघातात भाविक जखमी झाले. त्यात एक महिला गंभीर जखमी आहे स्थानिकांच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com